शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कळवण रस्त्यालगतच्या कॉलनीत समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:44 IST

देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देदेवळा : रस्ता डांबरीकरणाची मागणी

देवळा : देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र . १६ मध्ये रामराव हौसिंग सोसायटी ही वसाहत येते. वाजगाव व कळवण रस्त्याने जाणारी वाहने शॉर्टकट म्हणून या कॉलनी रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, देवळा शहराचा पश्चिम भाग, रामेश्वर, कनकापूर, कांचणे, मुलूखवाडी, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा, आदी गावांतील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत नेण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. ट्रॅक्टर, बैलगाडी, पिकअप यामुळे कॉलनी भागातील रस्त्याची वाताहत झाली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.कॉलनीपासून १०० मीटरवर देवळा शहर आहे. शेतकरी मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून कॉलनी रस्त्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने घेऊन जातात. यामुळे दिवसभर रामराव हौसिंग वसाहतीत ट्रॅक्टर, पिकअप, बैलगाडी, रिक्षा आदी वाहनांची वर्दळ असते. पहाटे पाच वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत दडीशे ते दोनशे वाहने या रस्त्याने ये-जा करतात.वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसभर सर्वत्र धूळ उडत असते. या भागातील घरातील वस्तूंवर धुळीचा थर दिसून येत आहे. यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे. धुळीमुळे येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. देवळा नगरपंचायतीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा