शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

थेट खरेदीला मूल्यांकनाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:09 IST

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी, महामार्गासाठी जागा जाणाºया शेतकºयांच्या गटातील अन्य मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणा अवलंबिल्याने खरेदीत अडचणी निर्माण झाल्या असून, त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जागेचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा जागा देण्यास प्रतिसाद मिळू लागला आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी, महामार्गासाठी जागा जाणाºया शेतकºयांच्या गटातील अन्य मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणा अवलंबिल्याने खरेदीत अडचणी निर्माण झाल्या असून, त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जागेचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा जागा देण्यास प्रतिसाद मिळू लागला आहे. आजपावेतो पंधराहून अधिक शेतकºयांनी पुढे येत जागेची खरेदी दिली असून, शेतकºयांना बाजारभावाच्या पाच पटीने अधिक पैसे देण्यात आले, शिवाय त्यांच्या शेतातील पिके, झाडे, फळबाग, विहीर, घर, गोठे, पाइपलाइन या साºया मालमत्तेचीही भरपाई देण्यात येत आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी दोन आठवड्यांपूर्वी प्रशासनाला पत्र देऊन जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र या शेतकºयांच्या शेतातील मालमत्तेचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने तीन आठवड्यांपूर्वी कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण या यंत्रणांची बैठक घेऊन लवकरात लवकर मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु मूल्यांकनाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सोमवारी या संदर्भात पुन्हा बैठक झाली असता, कृषी, वन व महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने बहुतांशी गावांतील मूल्यांकन पूर्ण केले, परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केल्याची बाब निदर्शनास आली. इगतपुरी तालुक्यातील एकाही गावात मूल्यांकन न झाल्याने जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली व येत्या आठवड्यात सर्वच यंत्रणांनी मूल्यांकनाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यावर थेट खरेदीला वेग येणार असून, शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील दोन शेतकºयांची जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे व उर्वरित खरेदी टप्पाटप्याने करण्यात येणार असल्याची माहितीविरोध मावळला?समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास विरोध दर्शविणाºया शेतकºयांचे मत परिवर्तन करण्यास प्रशासनाला यश मिळाले असून, त्यामुळे विरोधाची धार कमी झाली आहे. शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविण्याची बाब त्याचाच एक भाग आहे. शेतकरी संघर्ष समितीने या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.