सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील दुर्गानगर व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वीजतारा भूमिगत करण्याचा प्रश्न रेंगाळला होता मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना विभाग प्रमुख पवन मटाले यांनी याबाबत महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्गा नगर व परिसराची पाहणी करीत सोमवारपासून वीजतारा भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात केली. कित्येक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लवकरच ट्रान्स्फॉर्मर शिफ्ट करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(फोटो ०५ तारा) -
प्रभाग २५ मधील दुर्गा नगर भागातील वीजतारा भूमिगत करण्याचे सुरू असलेले काम.