शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालय-गटारींची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:21 IST

मालेगाव : महापालिका हद्दवाढ होऊन आता दहा वर्षं पूर्ण होत आले, मात्र अजूनही अनेक भागातील समस्या जैसे थे आहेत. ...

ठळक मुद्देकलेक्टरपट्टा परिसर : मूलभूत सोयी सुविधांपासून नागरिक वंचित

मालेगाव : महापालिका हद्दवाढ होऊन आता दहा वर्षं पूर्ण होत आले, मात्र अजूनही अनेक भागातील समस्या जैसे थे आहेत. कलेक्टर पट्टा भाग देखील या हद्दवाढीमध्ये समाविष्ट झाला, मात्र अजूनही या भागातील जागृतीनगर, नालंदानगर, नवीन वस्ती आदी भागात नागरी समस्यांचा अभाव आहे.कलेक्टर पट्टा भागाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. नागरी वसाहतीच्या तुलनेत या भागात मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. या परिसरात निसर्गनगर, श्रीकृष्ण कॉलनी, शरदनगर, कॉलनी, केशव नगर, कलेक्टर पट्टा नववसाहत, जागृतीनगर, नालंदानगर आदी भाग समाविष्ट होतो. यातील काही भागांमध्ये रस्ते झाले मात्र अजूनही बऱ्याच भागात रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. तसेच नवीन वस्ती भागात स्वच्छतागृहांची समस्या कायम आहे. या प्रभागामध्ये काही भाग वगळता सांडपाणी गटारींची सोय नाही त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडत आहे. परिसरात रस्ते अरुंद असल्याने शोषखड्डे भरले आहेत. त्यामुळे बºयाचदा सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने त्यातून वादही होतात. जागृतीनगर, नालंदानगर येथील मोकळ्या भूखंडावरही मोठ्या प्रमाणात कचºयाचे साम्राज्य आहे. त्यामुळे या भागाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन करणाची गरज आहे. कलेक्टर पट्ट्यातील शौचालय तसेच गटारींची समस्या गंभीर असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दंगल पीडितांची वसाहत म्हणून कलेक्टरपट्टा नावारुपाला आला आहे. प्रारंभी सोयगाव ग्रामपंचायत व महापालिकेतही कलेक्टरपट्ट्याचा सहभाग नसल्याने नागरिकांना नागरी समस्यांना सामोरे जावे लागत होते. हद्दवाढीनंतर कलेक्टरपट्ट्याचा समावेश महापालिकेत झाला आहे. नगरसेवक मदन गायकवाड यांनी या भागातील कच्चे रस्ते पक्के केले आहेत. जलकुंभ उभारुन जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. या भागात सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. रस्ते व पाण्याची समस्या सुटली असली तरी सार्वजनिक शौचालय व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या कलेक्टरपट्टा भागात काही सुविधा मिळाल्या आहेत. मात्र सार्वजनिक शौचालय, स्वच्छता, गटारींची समस्या जैसे थेच आहे.- रंजना धाबडले, रहिवासीमनपात समावेश होऊन दहा वर्षं उलटली आहेत. रस्ते व जलवाहिनीचे प्रश्न निकाली निघाले असले तरी नालंदानगर, नवीवस्ती परिसरात नागरी सुविधांची वानवा आहे. मनपाने या भागात स्वच्छता मोहीम राबवावी.- दीपा मंडाळे, रहिवासी

टॅग्स :Governmentसरकार