शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पेस्ट कंट्रोल’च्या ठेक्याबाबत घोळ कायम

By admin | Updated: December 29, 2015 00:17 IST

‘पेस्ट कंट्रोल’च्या ठेक्याबाबत घोळ कायम

नाशिक : पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप घोळ सुरूच असून, सध्याच्या ठेक्याची मुदत ३१ डिसेंबरला संपत असूनही प्रशासकीय स्तरावर फेरनिविदेबाबत हालचाल होताना दिसून येत नसल्याने पुन्हा एकदा स्थायीवर मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे. पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाचे असतानाही त्यावर विचार न करता पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीवर दीड महिन्यापूर्वी ठेवला होता. त्यावेळी सदस्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला होता आणि फेरनिविदा काढण्यावर ठाम राहात केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच मुदतवाढीला मान्यता देण्यात आली होती. पेस्ट कंट्रोलचा ठेका दिग्विजय कंपनीला देण्यास स्थायी समितीने यापूर्वीच विरोध केला आहे. स्थायीने आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आयुक्तांनी स्थायीचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला आहे, तर दिग्विजय कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे. शासनाकडूनही अद्याप ठरावावर काही निर्णय झाला नसल्याचे सांगितले जाते तर दिग्विजय कंपनीची याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. स्थायीवर मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला त्यावेळी प्रशासनाकडून शासन आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती. अखेर सभापती शिवाजी चुंभळे यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देत फेरनिविदा काढण्यावर स्थायी समिती ठाम असल्याचा पुनरुच्चार केला होता. आता सध्याच्या ठेक्याची मुदत संपण्यास अवघे तीन दिवस उरले असताना फेरनिविदेबाबत प्रशासनाकडून कसलीही हालचाल होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या येत्या सभेत पुन्हा एकदा प्रशासनाकडून पेस्ट कंट्रोल ठेक्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे. यावेळी स्थायीच्या निर्णयाकडे लक्ष लागून असणार आहे.