शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पांडवनगरी परिसरातील प्रश्न सुटला : नवीन जलकुंभातून पुरवठा सुरू बारा वर्षांचा पाण्याचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:42 IST

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या आहेत. अडीच हजार सदनिकांकधून शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करतात. परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत गेल्याने या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने परिसरात होणारा पाणीपुरवठा कमी पडत होता. त्यामुळे परिसरात बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्यातच दरवर्षी उन्हाळ्यात तर परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत. काही वेळा मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. तळपत्या उन्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेक वेळेस मनपा प्रशासनास निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. अखेर सुमारे एक वर्षापूर्वी पांडवनगरी परिसरासाठी स्वतंत्र वीस लाख लिटर जलक्षमता असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले. त्या जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने तातडीने नवीन जलकुंभातून परिसरात पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रभाग नगरसेवकांनी आयुक्त आणि महापौरांना भेटून मागणी केली होती. त्याची दखल घेत अखेर बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता मनपा पाणीपुरवठा अधिकाºयांनी मुबलक पाणी सोडून नागरिकांना सुखद धक्का दिला. या नवीन जलकुंभातून पांडवनगरी ते श्रद्धाविहार कॉलनीदरम्यान येत असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे बारा वर्षांपासूनचा कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सुरळीत पुरवठा व्हावाश्रद्धाविहार कॉलनीसह परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईस जनता त्रस्त झाली होती. प्रभाग नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी होळी सणाच्या दिवशी पाणीपुरवठा अधिकाºयांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. या नवीन जलकुंभामुळे पांडवनगरी परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाºया नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. आता जलकुंभ नियमित भरला जाऊन पाणीपुरवठा सुरळीत राहील हे पाहणेही महत्त्वाचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे