शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांची अडचण

By admin | Updated: August 8, 2016 22:18 IST

भऊर : शासन-व्यापाऱ्यांच्या गोंधळात शेतकऱ्यांचे नुकसान

भऊर : शासनातर्फे अडत बंदचा निर्णय तर व्यापारीवर्गातर्फे कांदा विक्रीसाठी गोणीतूनच आणावा या निर्णयाच्या गोंधळामुळे गत एक महिन्यापासून बाजार समितीमधील कांद्याचे व्यवहार बंद पडून शासन व व्यापाऱ्यांच्या भांडणात कांदा उत्पादक शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडून स्थानिक बाजारपेठांमध्येही आर्थिक व्यवहार ठप्प होऊन आर्थिक मंदी आल्याचे चित्र दिसून येत आहे.कसमादे परिसरात कांदा मुख्य पीक असून, या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून आहे. सध्या या ना त्या कारणाने कांद्याचे व्यवहार बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी एकीकडे आर्थिक भांडवलाची कमतरता, तर दुसरीकडे पावसाळा वाढून आर्द्रता वाढल्याने कांदा खराब होण्याची भीती या दुहेरी संकटात सापडला आहे. कसमादे परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कांद्याचे व्यवहार पुन्हा जुन्या पद्धतीनेच सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. डाळिंबावरील तेल्या रोग, दोन-तीन वर्षांपासूनची गारपीट, बेमोसमी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे कसमादे परिसरातील शेतकऱ्यांचे अगोदरपासूनच कंबरडे मोडलेले असताना उन्हाळी हंगामात दुष्काळी परिस्थिती असतानाही येथील कांदा उत्पादकांनी जिवाचे रान करून, कर्ज काढून, उधारी, हातउसनवारी करून बी-बियाणे, खत, खाद्याची उपलब्धता करून उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेऊन भविष्यात कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊन दोन पैसे पदरी पडतील या अपेक्षेत कांदा चाळीत साठवून ठेवला.पूर्वीच्या खुल्या विक्री पद्धतीसाठी लहान कुटुंबातील पती-पत्नी सकाळपासून सायंकाळपर्यंत कांद्याची निवड करून एक ट्रॉली भरत असत; परंतु सध्या गोणी भरायच्या असल्यास गोणींची किंमत, मजुरी व गोणींची आदळ-आपट, वाहतूक मध्यम कांदा उत्पादकाला अशक्य असल्यामुळे कांदा उत्पादक हतबल झाला आहे.गत हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे कसमादे परिसरातील शेतकरीवर्गाजवळ कांद्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही व हातात जगण्यासाठी पुरेसे भांडवलही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतातील उभ्या पिकांना खत, खाद्य, निंदणी, खुरपणी, फवारणीसाठी भांडवलाची गरज असून, कसमादे परिसरातील सर्वच क्षेत्रातील नेत्यांनी, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी वर्गाने शासन व व्यापारीवर्गात मधला पर्यायाने तडजोड करून कांद्याचे व्यवहार लवकरात लवकर सुरू करावेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)