शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालये बंद, महापालिकेवर ताण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:36 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले असले तरी रुग्णालये आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत. मात्र असे असताना अनेक रुग्णालये बुधवारी बंद करण्यात आली असून, थेट महापालिकेच्या रुग्णालयात किंवा सिव्हिलमध्ये रुग्णांना पाठवले जात आहे. परंतु यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन केले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी दिले स्पष्टीकरण : अत्यावश्यक सेवा सुरूच ठेवा

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले असले तरी रुग्णालये आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत. मात्र असे असताना अनेक रुग्णालये बुधवारी बंद करण्यात आली असून, थेट महापालिकेच्या रुग्णालयात किंवा सिव्हिलमध्ये रुग्णांना पाठवले जात आहे. परंतु यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन केले आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खासगी उद्योग व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले आहे. शासकीय कार्यालयातदेखील अवघे पाच टक्के कर्मचारीच उपस्थित राहात आहेत. असे असले तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. त्यात सर्व प्रकारची रुग्णालये आणि दवाखान्यांचा तसेच औषधालये, पेट्रोलपंप, खाद्य पार्सल सेवा, किराणा दुकाने यांचा समावेश आहे. भाजीबाजार आणि दूध विक्रीचीदेखील सुविधा आहे. मात्र, वैद्यकीय व्यवसायाची गरज असतानादेखील शहरातील अनेक रुग्णालये आणि दवाखाने बंद झाले असून, त्याठिकाणी रुग्ण गेल्यास महापालिकेच्या रुग्णालयात किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवित आहेत, असा फिडबॅक प्राप्त झाल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे म्हणणे आहे.मुळात जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना संशयित दाखल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील रुग्ण दाखल केले जात आहेत.कोरोना प्रतिबंध हे सर्वाधिक महत्त्वाचे काम जिल्हा शासकीय रुग्णालये आणि महापालिकेच्या रुग्णालयात प्राधान्य असताना अशाप्रकारे खासगी रुग्णालयातील रुग्ण तेथे पाठवून अकारण ताण निर्माण केला जात असल्याने अशाप्रकारे रुग्ण पाठवू नये, असे गमे यांनी आवाहन केले आहे.खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची रुग्णालये सुरू ठेवून सेवा देणे आवश्यक आहे. संचारबंदी काळातील त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलिसांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे कामावर जाता येईल. मात्र अकारण सेवा बंद ठेवून कोणीही अडवणूक करू नये.- राधाकृष्ण गमे, आयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका