शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षिततेची साधने नसल्याने खासगी रुग्णालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 00:47 IST

नाशिक : सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक अगतिक झाले असतानाच शहरात नव्हे तर राज्यात अनेक खासगी रुग्णालये आणि दवाखाने बंद झाले आहेत.

नाशिक : सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक अगतिक झाले असतानाच शहरात नव्हे तर राज्यात अनेक खासगी रुग्णालये आणि दवाखाने बंद झाले आहेत. शासन आणि प्रशासन याबाबत वैद्यकीय व्यावसायिकांना कारवाईचे इशारे देत असले तरी सद्यस्थितीत आवश्यक असलेली पीपीइ म्हणजे प्रायव्हेट प्रोटेक्शन इक्युपमेंट उपलब्ध होत नसल्याने रुग्णालये बंद ठेवण्याची वेळ आल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे एन-९५ मास्कचा नाशिकमध्ये काळाबाजार सुरूच असून, दोनशे ते अडीचशे रुपये मोजूनही मास्क मिळत नाही, त्यामुळे दवाखाने कसे काय सुरू ठेवणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यापासून राज्य शासनाने विशेष दक्षता घेताना नियमित ओपीडी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.मात्र, त्याचबरोबर अनेक दवाखाने आणि रुग्णालये बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मनपा आणि अन्य शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढल्याने मध्यंतरी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली होती. मात्र, या संदर्भात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या वेगळ्याच अडचणी पुढे आल्या आहेत.नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात बहुतांशी रुग्णालयात आणि वैद्यकीय व्यावसायिकांकडे प्राप्त परिस्थितीत सुरक्षित वैद्यकीय उपकरणे नाहीत. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफला एन-९५ मास्क, जंतू संसर्गापासून सुरक्षित असणारे गाउन्स आणि हॅण्ड ग्लोज, हॅण्ड सॅनिटायझर नाहीत. नाशिकच्या बाजारात तर एरव्ही-१३० रुपयांचा असणारा एन-९५ मास्क २०० ते २५० रुपयांना आहे, पण तरीही तो उपलब्ध होत नाही. या संदर्भात शासनाने काळाबाजार रोखून अतिरिक्त मास्क तसेच सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याचे आदेश कुचकामी ठरले आहेत. कोणताही रुग्ण आल्यानंतर तो कोरोनाचाच रुग्ण आहेत हे तपासणी शिवाय कळणार नाही, पण असा एकदा रुग्ण आला तर त्याच्यापासून बचावण्यासाठी म्हणजेच जंतू संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधने नाहीत केवळ डॉक्टर नव्हे तर त्यांच्याकडील पॅरा मेडिकल स्टाफसाठीसुद्धा कोणत्याही प्रकारची साधने नसतील तर दवाखाने कशी काय सुरू ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :docterडॉक्टर