शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांना खासगी जागांचा आधार

By admin | Updated: September 8, 2015 23:41 IST

गणेशमूर्ती विक्रीचा पेच : मालकांचा पुढाकार; मनपाकडूनही जागांचा शोध

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही पर्वणीमुळे यंदा नेहमीच्या ठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांना गाळे उपलब्ध करून देण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविल्यानंतर विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी जागामालक पुढे सरसावले असून, त्यांनीही त्यानिमित्त व्यवसायाची पर्वणी साधली आहे. दरम्यान, महापालिकेनेही विभागीय कार्यालयांमार्फत जागांचा अहवाल मागविला असून, प्रमुख रस्त्यांवर जागा उपलब्ध होणे दुरापास्त आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील द्वितीय पर्वणी १३ सप्टेंबर आणि तृतीय १८ सप्टेंबर रोजी आहे. दि. १७ सप्टेंबरला गणेश प्रतिष्ठापना होणार असल्याने त्यापूर्वी शहरात सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी भाविक मार्गांवर कोणतेही अडथळे येणार नाही, याची दक्षता घेतली आहे. परिणामी, महापालिकेने यंदा प्रमुख रस्त्यांलगत गणेशमूर्तीसाठी विक्रेत्यांना गाळे उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा विरोध डावलून व्यावसायिकांकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर गणेशमूर्ती विक्रीसाठी गाळे उभारले जात आहेत. मात्र, यंदा सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे गाळे उभारता येणार नसल्याने मोक्याच्या जागांचा शोध विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने विक्रेत्यांकडून मिळेल त्या खासगीजागांवर गाळे उभारणी केली जात असून, विक्रेत्यांची निकड लक्षात घेता काही खासगी जागामालकांनीही आपले मोकळे भूखंड गाळे उभारणीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी शहरात जाहिरातीही झळकत आहेत. प्रामुख्याने मुंबई नाक्यावरील हॉटेल किनारालगत खासगी जागेत सुमारे ७० गाळे उभारण्यात आले असून, त्यांचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले, तर गंगापूररोडवर खतीब डेअरीसमोर तसेच श्रद्धा पेट्रोलपंपाजवळील जागेतही गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे खासगी जागामालकांनाही व्यवसायाची संधी चालून आली आहे. यंदा गणेशमूर्ती खरेदीसाठी नाशिककरांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागणार आहे. दरम्यान, शहरातील काही खासगी जागांवर तसेच दुकानांमध्ये गणेशमूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या असून, मूर्ती आरक्षित करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)