शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात खासगी रुग्णवाहिका चालकांचा संप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

तहसीलदार प्रमोद हिले यांना खासगी रुग्णवाहिका चालकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. नाशिक शहरात बी साइड यू या कंपनीमार्फत ...

तहसीलदार प्रमोद हिले यांना खासगी रुग्णवाहिका चालकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. नाशिक शहरात बी साइड यू या कंपनीमार्फत रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिक शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकांना मोठा फटका बसला आहे. सदर कंपनीची सेवा जिल्हाभरात प्रस्तावित आहे. भविष्यात असे झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ येईल, असे सदर निवेदनात म्हटले आहे.

नाशिक शहरात जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या वतीने सर्व खासगी रुग्णवाहिका चालक-मालक यांच्या वतीने बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. त्यास पाठिंबा म्हणून तालुक्यातील रुग्णवाहिका चालक-मालक संघटनाही सदर संपात सहभागी आहे. खासगी रुग्णवाहिका चालकांच्या हितासाठी यात हस्तक्षेप करावा, असे सदर निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकांच्या संपामुळे सकाळपासून सर्व प्रकारची रुग्णसेवा थांबली आहे. परिणामी, काही प्रमाणात खासगी रुग्णालयातील रुग्णांचे रुग्णवाहिकांअभावी हाल झाल्याचे दिसून आले.

(०७ येवला ४)

070921\07nsk_40_07092021_13.jpg

०७ येवला ४