शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात खासगी रुग्णवाहिका चालकांचा संप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 22:56 IST

येवला : जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकही संपात सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ येईल

येवला : जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकही संपात सहभागी झाले आहेत.तहसीलदार प्रमोद हिले यांना खासगी रुग्णवाहिका चालकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. नाशिक शहरात बी साइड यू या कंपनीमार्फत रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिक शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकांना मोठा फटका बसला आहे.

सदर कंपनीची सेवा जिल्हाभरात प्रस्तावित आहे. भविष्यात असे झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ येईल, असे सदर निवेदनात म्हटले आहे.नाशिक शहरात जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या वतीने सर्व खासगी रुग्णवाहिका चालक-मालक यांच्या वतीने बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. त्यास पाठिंबा म्हणून तालुक्यातील रुग्णवाहिका चालक-मालक संघटनाही सदर संपात सहभागी आहे. खासगी रुग्णवाहिका चालकांच्या हितासाठी यात हस्तक्षेप करावा, असे सदर निवेदनात म्हटले आहे.दरम्यान, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकांच्या संपामुळे सकाळपासून सर्व प्रकारची रुग्णसेवा थांबली आहे. परिणामी, काही प्रमाणात खासगी रुग्णालयातील रुग्णांचे रुग्णवाहिकांअभावी हाल झाल्याचे दिसून आले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलStrikeसंप