शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराच चव्हाण : गोदाकाठ सरस ‘रत्नां’ची खाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:19 IST

नाशिक : साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होतील, असे अनुकूल वातावरण येथे आहे यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.सुविचार ...

ठळक मुद्दे ‘सुविचार गौरव’ पुरस्कार वितरणप्रतापदादा सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव

नाशिक : साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होतील, असे अनुकूल वातावरण येथे आहे यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.सुविचार मंच या संस्थेच्या वतीने सोमवारी (दि.१३) रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘सुविचार गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक खुटाडे यांच्यासह पुरस्कारार्थींमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले, यशोशिखर सर करण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. त्यामुळे जीवनात ठरविलेले ध्येय साध्य करताना येणाऱ्या संकटांमुळे खचून जाऊ नये. जिद्दीने त्यावर मात करावी आणि आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले.दरम्यान, विनायकदादा यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले, समाजातून प्रेरणादायी कर्तृत्वान माणसे हेरणे आणि त्यांची पुन्हा समाजापुढे पेरणी करणे हे अत्यंत अवघड असे काम आहे, हे काम ही संस्था लीलया पार पाडत असून ही अत्यंंत कौतुकास्पद बाब आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केले. सूत्रसंचालन आकाश पगार यांनी केले.असे आहेत पुरस्कारार्थीमाजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, डॉ. रवींद्र सपकाळ, डॉ. आशुतोष साहू, दीपक बागड, डॉ. विनोद गोरवाडकर, क्रिकेटपटू माया सोनवणे, विश्वास ठाकूर यांनाही ‘सुविचार गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.द्राक्ष-रुद्राक्षाची संस्कृती लाभलेल्या शहरात एका सामाजिक संस्थेकडून बहुमान मिळणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. नाशिकचे पाणी अन् मातीत वेगळाच कस आहे. मराठी चित्रपटसृष्टीला ‘अच्छे दिन’ प्रेक्षकांमुळेच आले आहेत.- स्वप्नील जोशी, अभिनेता--

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSwapnil Joshiस्वप्निल जोशीNashikनाशिकgodavariगोदावरी