शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

बलात्कार प्रकरणी आरोपीस कारावास

By admin | Updated: January 21, 2017 22:55 IST

वडनेर भैरव येथील घटना : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

निफाड : चांदवड तालुक्यातील नवापूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी चिंतामण पोपट गांगुर्डे यास जिल्हा व  सत्र न्यायालयाचे न्यायाधीश  आर. एस. घाटपांडे यांनी सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.  याबाबत पीडितेच्या वडिलांनी ५ डिसेंबर २०१० रोजी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, सोळावर्षीय अल्पवयीन मुलगी २२ नोव्हेंबर २०१० रोजी दहावीचा फेरपरीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी नवापूर शिवारातून चिखलआंबे फाट्यावरील शाळेत गेली होती. मात्र ती घरी परत आली नाही. म्हणून २७ नोव्हेंबर २०१० रोजी मुलगी हरविल्याची तक्र ार नोंदविली. याच दरम्यान स्थानिक चिंतामण पोपट गांगुर्डे हादेखील गावात दिसत नसल्याने त्यानेच मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. अधिक तपास केला असता तो सांगवी (जि. धुळे) येथील नातेवाइकांकडे असल्याचे समजले. तेथे जाऊन खात्री केली असता चिंतामण गांगुर्डेसह अल्पवयीन मुलगीदेखील तेथे मिळून आली. चिंतामणने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती या अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली. त्यावरुन गांगुर्डेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.  सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून गांगुर्डेविरुद्ध निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकार पक्षातर्फेसहायक जिल्हा सरकारी वकील व्ही. एन. हाडपे यांनी एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरु न गांगुर्डे यास भादंवि कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अधिक कारावास, भादंवि कलम ३६६ (अ) नुसार पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अधिक कारावास, ३७६ (अ) नुसार सात वर्षे सश्रम कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास चार महिने अधिक कारावास, अशी शिक्षा सुनावली असून, सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. (वार्ताहर)