शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:51 IST

खुनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी ऊर्फ गौतम काशीनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तर प्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) मध्यरात्री चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी ऊर्फ गौतम काशीनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तर प्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) मध्यरात्री चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्यात २००४ मध्ये महंत मोहनगिरी जोशीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात न्यायालयाने महंत जोशी यांना १२ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़ गत दहा ते बारा वर्षांपासून मोहनगिरी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते़ त्यांचा बंदी क्रमांक पी-७१ असा होता़  महंत मोहनगिरी जोशी या बंदीवानाने गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातील रुग्ण विभागातील शौचालयात आपल्याकडील चादर फाडून स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही बाब लक्षात येताच तत्काळ उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़महंत म्हणून ओळख असलेले मोहनगिरी यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना खुल्या कारागृहात ठेवलेले होते़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़