शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड कारागृहातून कैदी फरार

By admin | Updated: May 28, 2015 23:23 IST

नाशिकरोड कारागृहातून कैदी फरार

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून शेतीकामासाठी कारागृहाच्या पाठीमागील मोठा बगीचा येथे कामाकरिता नेलेल्या कैद्यांपैकी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी गुरुवारी दुपारी पळून गेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पळून गेलेल्या कैद्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडून आला नाही.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दररोज कारागृहाच्या विविध कामांसाठी पाठविण्यात येत असते. गुरूवारी सकाळी ८ वाजता कारागृहातील १९ कैदी कारागृहापाठीमागील   गोरेवाडी येथील मोठा बगीचा येथे शेती कामासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर देखरेख ठेवण्यासाठी कारागृहाचे दोन कर्मचारी देखील हजर होते. दुपारी दोनच्या सुमारास शेती कामासाठी नेण्यात आलेले कैदी हे जेवणासाठी एकत्र जमले असता कैदी महम्मद इस्माईल इब्रीस हा उपस्थित नसल्याचे कारागृह कर्मचाऱ्यांचे लक्षात आले. कर्मचारी व कैद्यांनी मोठा बगीचा व आजुबाजुच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र कैदी महम्मद इब्रीस दिसून न आल्याने सदरील बाब कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कैदी महम्मद इब्रीस हा नजर चुकवून पळून गेल्याचे स्पष्ट होताच सदर माहिती नाशिकरोड पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी रेल्वे स्थानक, बसस्थानक, हॉटेल, लॉजिंग आदि ठिकाणी सर्वत्र तपासणी व शोधाशोध केली. सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे आदि पोलीस अधिकाऱ्यांनी कारागृहाचा मोठा बगीचा येथे भेट देऊन आजुबाजुला विचारपूस केली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा सुगावा लागु शकला नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)