शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

छपाई, वितरण सरकारचे, मग घोळ का?

By admin | Updated: January 18, 2017 00:31 IST

शिक्षण संघटनांचा सवाल : पुस्तकांचे पैसे वेळेत बँक खात्यावर जमा व्हावे, नागरिकांची मागणी

नाशिक : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र आता थेट पुस्तके देण्याऐवजी त्यासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. परंतु, जर सरकारच पुस्तकांची छपाई करणार असेल, तर ती वितरित करणे सोपे असताना हा बँकेत फेऱ्या घालण्याचा मार्ग का? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रात उपस्थित केला जात आहे. सरकारच्या विविध योजनांचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. ते पैसे त्यांच्यासाठीच वापरले जातात का? याची कोणतीही खातरजमा न करता सरकारने हा निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते, असे मत शिक्षण बाजारीकरण विरोधी समित्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे भविष्यात कदाचित सेल्फीप्रमाणे या निर्णयावरही सरकारला माघार घ्यावी लागण्याची शक्यता असल्याचेही शिक्षणवर्तुळात बोलले जात आहे. सरकारी योजनांचा निधी थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सरकारने विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्तुत्य आहे तसेच सरकारी पातळीवर त्याची अंमलबजावणीही योग्य प्रकारे होत आहे. विद्यार्थ्यांचे त्या-त्या योजनांचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. मात्र पालकांच्या स्वाक्षरीशिवाय ते हे पैसे वापरू शकत नाहीत. ग्रामीण भागातील अनेक पालक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी पैसे उपलब्ध करून देत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे आश्रमशाळांमध्ये दरवर्षी थंडीत स्वेटरचे वाटप केले जायचे. मात्र यंदा स्वेटरऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. असे झाल्याने कडाक्याची थंडी पडली तरी अनेक विद्यार्थी स्वेटरशिवाय आहेत. तर अनेक जण जुने स्वेटरच वापरत आहेत. असाच अनुभव सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेच्या बाबतीत येत असल्याचे शिक्षण संघटना तसेच शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांचे म्हणणे आहे. या योजनेचे पाचवीपर्यंतचे एक हजार रुपये आणि त्यावरील आठवीपर्यंतच्या वर्गासाठीचे दीड हजार रु पये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात, मात्र ते पैसे शैक्षणिक कामासाठी मागितले असता केवळ दहा टक्केच पालक पुढे येत असल्याचे प्रकार समोर घडत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेशी थेट संबंधित असल्याने पुस्तकांविषयीच्या योजनेत सरकारला यश आले तर बरे, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षच धोक्यात येण्याची शक्यता काही संघटनांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)