लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : मुळाणे येथील आदिवासी वस्तीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. छाप्यात एका मटका चालकाला रंगेहाथ पकडून ४५ हजार रु पयांची रोकड जप्त केली आहे. येथील आदिवासी वस्तीत एक युवक मटका चालवत असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. आज गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. बी. गिरी, एस. एस. जाधव, नामदेव खैरनार, दीपक अहिरे, जगताप व बहिरम यांच्या पथकाने छापा टाकला. छाप्यात राजू फुला गायकवाड (वय 32,राहणार मुळाणे)हा युवक लोकांकडून पैसे घेवून कल्याण,टाइम नावाचा मटका जुगार खेळतांना आढळून आला.पोलिसांनी जुगाराचे साहित्य,मोटारसायकल व रोख रक्कम असा 54 हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी सटाणा पोलिसांत राजू गायकवाड याला अटक करून त्याच्या विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
मटका अड्ड्यावर छापा
By admin | Updated: July 7, 2017 23:36 IST