शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर छापा

By admin | Updated: July 8, 2017 00:02 IST

कळवण : साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट दाखले हस्तगत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : शहरातील एसटी बसस्थानक परिसरात सबस्टेशन रोडवरील साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर विविध दाखले व शासकीय दस्तावेज तयार करून देण्याचा गोरख धंदा सुरु असल्याची तक्रार करण्यात आल्याने पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट दाखले हस्तगत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.कळवणच्या एका तक्र ारदारासह महसूल कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार कळवण पोलिसांनी साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर सकाळी ११ वाजता छापा टाकून कारवाई केली. आॅनलाइन सेंटर चालकासह तीन जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अनेक बनावट कागदपत्रे आढळून आले. तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे कळवण शहरात खोटे दाखले देण्याचे रॅकेट कार्यरत असल्याची लेखी तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार तहसीलदार कैलास चावडे यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुपते व पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या पथकाने सकाळी ११ वाजेच्या सुमारास साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर छापा टाकला.बनावट उत्पन्नाचे दाखले, डोमेसाइल , जातीचे दाखले, रेशन कार्ड, नॅशनलीटी, जेष्ठ नागरिक कार्ड, रबरी शिक्के व शासकीय कागदपत्रे ताब्यात घेतली. यावेळी आॅनलाईन सेंटरचा संचालक कैलास चौरे सह तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते