शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

सिन्नर टॅलेंट सर्च परिक्षेतील गुणवंतांचा गौरव

By admin | Updated: September 21, 2015 22:50 IST

उज्वल निकम : जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाला साक्षीदार बनवा

 सिन्नर : अतिरेकी स्वप्ने पाहून जीवनात यश मिळत नाही. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्व प्रकारचे खटले चालवितांना विविध अनुभव घेतले. नेता असो किंवा अभिनेता खोटी गांधीगिरी करुन पाप धुतले जात नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाला साक्षीदार बनवा असा सल्ला राज्याचे विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम यांनी दिला. सिन्नर पोलीस ठाणे, लायन्स क्लब, साहस ग्रुप व सह्याद्री युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिन्नर टॅलेंट सर्च परिक्षेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे पार पडला. सहकार व पणन राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अँड. निकम बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे, लायन्स क्लबचे अध्यक्ष कृष्णा भगत, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, नगराध्यक्ष आश्‍विनी देशमुख, हेमंत वाजे, उदय सांगळे, पोलीस निरीक्षक किशोर नवले, प्रशांत दिवे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. परिक्षेतील विविध गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना निकम, भुसे व वाजे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून शाळेत सदगुण शिकविले जात नाही. चौफेर लक्ष ठेवून ते मिळवावे लागतात. असे काम करणारेच आयुष्यात यशस्वी होतात असे त्यांनी सांगितले. जोपर्यंत कठोर परिश्रम केले जात नाही तोपर्यंत कोणीही यशस्वी होत नसल्याचे अँड. निकम म्हणाले. सिन्नर टॅलेंट सर्च हा उपक्रम मालेगाव मध्ये सुरु करणार असल्याची घोषणा करून विद्यार्थ्यांना कलागुण दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार्‍या समितीचे भुसे यांनी आभार मानले. जबाबदारी निष्ठेने पार पाडली तर परमेश्‍वरालाही यश द्यावे लागते असेही ते म्हणाले. उदय सांगळे, हेमंत वाजे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक कृष्णा भगत यांनी केले.(वार्ताहर)