नाशिक : अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांचा, तसेच शिबिर संयोजकांचा गौरव करण्यात आला. यावेळी ऐच्छिक रक्तदानासाठी दात्यांना आवाहन करण्यात आले. हॉटेल पंचवटी येथे आयोजित सोहळ्यात ८० रक्तदाते व शिबिर संयोजकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोखले शिक्षण संस्थेच्या झोनल सेक्रेटरी डॉ. दीप्ती देशपांडे व प्राचार्य के. आर. शिंपी उपस्थित होते. यावेळी थॅलेसेमिया रुग्णांसाठी तयार करण्यात आलेली फिल्म दाखविण्यात आली. डॉ. शशिकांत पाटील यांनी अर्पण रक्तपेढीच्या कामकाजाची माहिती दिली. वर्षा उगावकर यांनी अर्पण रक्तपेढीच्या विस्तारकार्याची माहिती देत थॅलेसेमिया पीडितांसाठीही होत असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन भाग्यश्री पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर रक्तपेढीचे उपाध्यक्ष डॉ. अतुल जैन, नरेंद्रभाई शाह उपस्थित होते.
रक्तदात्यांचा गौरव
By admin | Updated: October 21, 2015 22:47 IST