शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भडकले भाज्यांचे भाव

By admin | Updated: June 1, 2017 02:00 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरु वारपासून (दि. १) शेतकरी संपावर जाणार आहेत

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरु वारपासून (दि. १) शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम किसान क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीकडून सुरू असून, जिल्हाभरातून सुमारे तेराशेहून अधिक गावांतील शेतकरी या संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने शहरातील नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली असून, आठवडे बाजारासह शहरातील विविध ठिकाणच्या भाजी बाजारात किमान आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करणाऱ्या गृहिणींची संख्या जास्त होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी संपाची माहिती पोहोचविण्याबरोबरच माहितीपत्रके आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून संपाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिवण्यात येत आहे. शेतात पिकणारा माल शहर परिसरात विक्र ीला जाऊ द्यायचा नाही, याची दक्षता प्रत्येक गावाने गावपातळीवरच घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या संपात गावागावांतून सहभागी झालेले शेतकरी अपवादात्मकरीत्या बाजारात येऊ पाहणाऱ्या गाड्यांनाही अडवणार आहे. त्यामुळे शहराचा भाजीपाल्याच्या पुरवठा खंडित होणार आहे. या संपाचा विचार सर्वसामान्य नाशिककरांना सतावत असताना भाजीविक्रे त्यांनी मात्र भाज्यांचे भाव वाढवून विक्री सुरू केल्याचे प्रकारही समोर आले असून, शहरात खुल्या विक्रीसाठी आलेले दूधही हातोहात संपल्याचे दिसून आले. सर्वसामान्य ग्राहकांनी जरी दुधाचा साठा केला नसला तरी छोटे चहा टपरीवाले व्यावसायिकांनी किमान दोन दिवस पुरेल इतके दूध घेतल्याचे दिसून आले. शेतकरी संपात दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतच अनेक दूध डेअरींनीही सहभाग नोंदविल्यामुळे गुरुवारपासून शहरी भागात पिशवीबंद दुधाचाही तुटवडा निर्माण होणार आहे. तर दोन दिवसांनी असे पिशवीबंद दूधही मिळणार नाही. त्यामुळे चहाचे टपलीवाले व दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.गुरुवारी शेतकरी संपावर जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बुधवारीच बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला. तर भाजीपाला तुटवड्याच्या भितीने व्यापाऱ्यांनीदेखील खरेदीसाठी गर्दी केली.