शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कांदाच्या भावात घसरण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:38 IST

खामखेडा : मागील दोन वर्षापुर्वी प्रंचड भावाने विकला गेलेला लाल कांदाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : लासलगावी लाल कांदा ८ रूपये, तर उन्हाळ कांदा ३़२५ रूपये प्रतिकिलो

खामखेडा : मागील दोन वर्षापुर्वी प्रंचड भावाने विकला गेलेला लाल कांदाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.कांघ्याच्या दरात दररोज घसरना होताना असतानाही खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. या पुढे कांद्या काय होईल याचा विचार न करता पुढे परिस्थित बदल होऊन कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा उत्पादक शेतकरी कांदा पिकावर गुंतवणूक करीत आहे.चालु वर्षी जरी उन्हाळी कांद्याचे तोट्यात आला असला तरी शेतकरी महागडी असे कांद्याची रोपे विकत घेऊन उन्हाळी कांद्याची लागवड करीत आहे.चालु वर्षी उशिरा पाऊसामुळे लाल कांद्याची लागवड उशिरा झाली आहे दरवर्षी लाल कांद्याची लागवड आॅगस्ट मिहन्यात केली जाते.तेव्हा आॅक्टोबर मिहन्यात लाल कांदा बाजारात दाखल होता.परंतु चालु वर्षी शेतकर्याने सुरवातीच्या पावसावर लाल कांद्याचे बियाणे टाकले.नंतर पाऊस न झाल्याने विहीरिणा पाणी न उतरल्यामुळे लागवडी साठी तयार झालेले कांद्याचे रोपे लागवड करता आली नाही.पाऊस पडल्यामुळे पुन्हा शेतकर्याने कांद्याच्या बियाणाचा शोध करून पुन्हा कांद्याची रोपे तयार करून लाल कांद्याची लागवड केली. सुरवातील लाल कांद्याला चागल्या पैकी भाव होता. आता सर्वत्र लाल कांदा काढण्याचे कामे चालु आहे.या वर्षी लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे.त्यामुळे लाल कांद्याच्या भावामघ्ये मोठ्या प्रमाणात घसरणा झाली आहे.पाहिजे त्या प्रमाणात चांगला भाव मिळत नाही.त्यात लाल कांदा हां जास्त दिवस जमिनीत ठेवता येत नाही.व चाळीतही साठवत येत नाही त्यामुळे तो काढणी केल्यानंतर विक्र ी केल्या शिवाय शेतकरयाजवळ पर्याय नाही. जर लाल कांद्याचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर बियाणे,लागवडीचा खर्च ,खते,तर एकरी पंधरा ते वीस खर्च होतो.सुरवातीला जो लाल कांदा १५०० ते २५०० रु पया रु पयापर्यत विकला जात होता तोच कांदा आता पाचशे ते नऊ रु पये हजार रु पये दरम्यान विक्र ी्री होत आहे चालु वर्षी उन्हाळी कांदा कविडमोल भावाने विकला जात आहे. आता सध्या तरी उन्हाळी कांद्याची मोठी बिकट अवस्था झाली आहे.बाजातरात नेल्यावर व्यापारी उन्हाळी कांदा घेण्यास नाखुश आहेत.तो अगदी लूट भावाने विकला जात आहे.त्यामुळे काही वेळेस वाहनाचे भाडे सुद्धा मिळत नाही.नांदूरशिंगोटेत भाव कोसळल्याने नाराजीनांदूरशिंगोटे : सद्य: स्थितीत कांद्याचे भाव कोसळल्याने कांदाउत्पादक शेतकरी हवालिदल झाले आहेत. दोनशे ते तीनशे रूपये क्विंटलपर्यंत कांद्याचे भाव पडले आहेत.मातीमोल भावाने कांदा विकला जात असल्याने शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. सिन्नर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कांद्याकडे नगदी पीक म्हणून पाहू लागले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या अनेक भागात शेतक-यांनी मोठया प्रमाणात कांदा लागवड केली होती. यावर्षी कांद्यास चांगला भाव मिळेल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक केली होती. मात्र, मोठया प्रमाणात कांदा आवक वाढू लागल्याने त्याचा परिणाम भावात घसरण होण्यावर झाला. रोपे व बियाणे, खते, मशागत, कांदा लागवड, काढणी, कापणी, वाहतूक असा कांद्यास क्विंटलला पाचशे रूपयांहून अधिक उत्पादन खर्च येत आहे. सध्या उन्हाळ कांद्यास क्विंटलला दोनशे ते तीनशे रूपये भाव मिळत असल्याचे चित्र आहे. परिसरातील शेतकºयांनी उन्हाळ कांदा तब्बल सात ते आठ महिने सांभाळत साठवून ठेवला होता. कांद्याच्या भावात सर्वच ठिकाणी घसरण झाल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत.