शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, ...

महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच्या सीमेला लागून आहे. यामुळे सातत्याने दऱ्याखोऱ्यातील चोरट्या वाटेने तस्कर टोळ्या घुसखोरी करतात. काही दिवसांपूर्वीच नाशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुजरात वनविभागाच्या सापुतारा, डांग, कपराडा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांसोबत ‘बॉर्डर मीटिंग’ घेत जंगलतोड करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी एकमेकांना संयुक्तरीत्या मदत करत ‘ॲक्शन प्लॅन’ राबिवण्याचा निर्धार केला. या बैठकीला आठवडा होत नाही, तोच उंबरठाण वनपरिक्षेत्रात तस्करांनी घुसखोरी करत खैराच्या झाडांवर घाव घातला. तोडलेला खैर गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा मनसुबा वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व त्यांच्या पथकाने उधळून लावला. चोखपणे रात्रीची गस्त घालत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून शिताफीने अवैधरीत्या खैर वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या वाहनांना ‘ब्रेक’ लावला. पथकाने मौजे पांगारणे शिवारात पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या भरधाव जाणारी मॅक्स जीप (जीजे ०६ बीए६१३८), दोन क्वालिस कार (जीजे२१ ५९६४) व (जीजे१९ ए ४४१४) राेखल्या. या वाहनांमधून सहा हजार ८६२ रुपये किमतीचे खैराचे एकूण १७ नग जप्त करण्यात आले. तसेच तीनही वाहनांसह सुमारे २ लाख ७६ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या पथकाने या कारवाईत जप्त केला आहे.

---इन्फो--

वनविभागाच्या पथकाने लावलेला सापळा लक्षात आल्यानंतर संशयित तस्करांनी वाहने भरधाव दामटवित हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात तीनही वाहने बेवारस सोडून वाहनचालकांसह त्यांच्या इतर साथीदारांनी वनविभागाच्या पाठलाग करणाऱ्या गस्ती पथकाची नजर चुकवून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. दरम्यान, सीमावर्ती गुजरात वनविभागाच्या तपासणी नाक्यांनाही याबाबत ॲलर्ट देण्यात आला आहे.

---

फोटो आर वर १६फॉरेस्ट नावाने आर वर सेव्ह आहे.