शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहास विरोध करणाऱ्यांना प्रतिबंध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:46 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वसतिगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाºयांना सोमवारी (दि. २०) निवेदन दिले.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वसतिगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाºयांना सोमवारी (दि. २०) निवेदन दिले. वसतिगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाºया प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच जिल्हाभरासह संपूर्ण शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.  गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला यश येत असताना काही समाजविघातक प्रवृत्ती विरोधाची भूमिका घेऊन शांततेच्या मानसिकतेत असलेल्या मराठा समाजाच्या सहनशक्तीला आव्हान देत सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केला आहे. अशा नाठाळ प्रवत्ती जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या अस्मितेला डिवचून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कुटिलपणा करीत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठा समाजाला अथक प्रयत्नानंतर मिळालेले वसतिगृह हिरावून घेण्याचा यामागे डाव खेळला जात असल्याचे वसतिगृहाच्या जागेला होत असल्याच्या विरोधातून समोर येत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी गंगापूररोडवरील भूखंड मंजूर केला आहे. ही बाब सहन न झालेल्या काही प्रवृत्तींनी या जागेवर वसतिगृह बांधण्यास विरोध दर्शविला आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन या समाज विघातक प्रवृत्तींचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करून वसतिगृह बांधकामाला गती द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम,विलास जाधव, संदीप लभडे, मदन गाडे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अनुपमा पाटील, ज्ञानेश्वर  जाधव, ज्ञानेश्वर भोसले, अ‍ॅड. नीलेश संधान, विकास काळे, आप्पासाहेब गाडे, नीलेश पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय