शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
2
Smriti Mandhana : "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
3
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
4
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
5
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
6
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
7
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
8
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
9
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
10
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
11
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
12
बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
13
गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न! गॅस स्फोटात विम्याचे नियम काय? 'या' चुकीमुळे ५० लाखांचे कवच गमावले!
14
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
15
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
16
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
17
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
18
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
19
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
20
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असुविधांचा पसारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:12 IST

त्र्यंबकेश्वर : मुलींनी वाचला समस्यांचा पाढा, दुर्लक्षाबद्दल संताप

ठळक मुद्देमुलींचे वसतिगृह असूनही इमारतीला संरक्षण भिंत नाही

त्र्यंबकेश्वर : येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात असुविधांचा पसारा वाढत चालल्याचे सांगत एकेक समस्यांचा पाढा वसतिगृहातील विदयार्थिनींनी पत्रकारांसमोर बोलताना वाचला. कडाक्याच्या थंडीतही मुलींना थंडगार पाण्याने स्नान करावे लागते, वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहात अंधार असतो अशा एक ना अनेक तक्रारी करत मुलींनी सामाजिक न्याय विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाच्या नाशिक सामाजिक न्याय विभागाचे त्र्यंबकेश्वर रिंगरोडवर मुलींसाठी वसतिगृह आहे. सदरचे वसतिगृह गावापासून दीड ते दोन कि.मी.अंतरावर एकांत जागी आहे . ही इमारत फक्त पुर्वेकडे बंदीस्त आहे. तर अन्य बाजू मोकळ्याच आहेत. मुलींचे वसतिगृह असूनही इमारतीला संरक्षण भिंत नाही. एकांत जागी असल्याने इमारतीत सर्पांचा वावर आहे. वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्व मुली माधवगिरी महाराजांच्या संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात पाणी पिण्यासाठी जात असतात. टॉयलेट बाथरु ममध्ये अंधार असतो. मध्यंतरी रात्री होस्टेलवर दगड येत असत. पोलीसांकडे तक्र ार केल्यावर पोलीसांनी गस्त सुरु केल्यामुळे लगेच दगडफेकीचा प्रकार बंद झाला. वॉर्डनकडे असलेले अधिकारही सीमित आहेत. त्यांच्या अधिकाराच्या पुढील कोणतेही काम करायला वरिष्ठांकडे अर्ज करावे लागतात. गरम पाण्यासाठी बंब करायचा आहे मात्र, चार महिन्यांपासून नाशिक कार्यालयात त्यासंबंधीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ऐन थंडीत मुलींना थंड पाण्याने स्नान करावे लागत आहे. एकीकडे मुलींसाठी शिक्षणाबाबत शासन अग्रेसर असताना शासनाच्याच विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल मुलींनी संताप व्यक्त केला. यावेळी वसतिगृहाच्या वॉर्डन उपस्थित होत्या.

टॅग्स :NashikनाशिकSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय