शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

‘हायप्रोफाइल’ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: November 18, 2016 22:38 IST

लक्षवेधी : गणेशपेठेतील लढत सिन्नर शहरवासीयांची उत्कंठा वाढविणारी; खरी लढत तिरंगीच

सिन्नर : शहरातील गणेशपेठ या व्यावसायिक भागापासून ते वावी वेस झोपडपट्टीपर्यंत विस्तारलेल्या प्रभाग ६ ब मध्ये हायप्रोफाइल उमेदवारांमुळे चुरशीची लढत होत आहे. प्रभाग ६ ब मध्ये या दिग्गज उमेदवारांमुळे पक्षाची व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, भाजपाचे उमेदवार व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक युगेंद्र क्षत्रिय, कॉँग्रेसचे उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारूवाले या दिग्गजांसह मनसेचे कैलास दातीर व अपक्ष योगेश क्षत्रिय या प्रभागात आपले नशीब आजमावत आहेत. हेमंत वाजे, युगेंद्र क्षत्रिय व मेहमूद दारूवाले असे हायप्रोफाइल व दिग्गज मैदानात असल्याने शहरवासीयांच्या नजरा या प्रभागाकडे लागून राहिल्या आहेत. निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात पाच उमेदवार दिसत असले तरी खरी लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उमेदवार हेमंत वाजे हे आमदार राजाभाऊ वाजे यांचे चुलत चुलते आहेत. लायन्स क्लबसारख्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदर्श कामे उभी केली आहेत. मातोश्री दिवंगत आमदार रुख्मिणीबाई वाजे यांचा लोकसेवेचा वारसा लाभलेल्या हेमंत वाजे यांच्यासाठी सदर निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. वाजे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविलेले असल्याने त्यांना पालिका कामाचा अनुभव आहे. अतिशय सोज्वळ प्रतिमा असलेले व प्रत्येकाच्या मदतीला धावणाऱ्या हेमंत वाजे यांच्या उमेदवारीने आमदार वाजे यांच्यासह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मनसेने कैलास दातीर यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी मनसेचे तालुका संघटक व मनसे मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मनसेच्या विविध आंदोलनात त्यांचा सहभाग दिसून येतो. सामाजिक उपक्रमात ते दिसून येतात. अपक्ष उमेदवार योगेश क्षत्रिय यांनीही या प्रभागात दिग्गजांसमोर आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रभाग ६ अ हा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. या प्रभागातून भाजपाच्या चैताली रामनाथ मोरे, शिवसेनेच्या विजया शरद बर्डे व कॉँग्रेसच्या अनिता उदय नाईक निवडणूक रिंगणात आहेत. (वार्ताहर)