शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

माघारीसाठी दबाव अन् मनधरणीही

By admin | Updated: February 7, 2017 22:51 IST

अखेरचा दिवस गाजला : अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला केले पाचारण

नाशिक : प्रतिस्पर्ध्यांवर असलेले लक्ष, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा व टळत जाणारी वेळ असे चित्र मंगळवारी नाशिक शहरातील सहाही विभागीय कार्यालयांबाहेर पाहण्यात आले. काहींनी थेट मनधरणी करीत अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला मानसन्मानाने माघारीसाठी पाचरण केले, तर काहींनी धाकदपडशा दाखवून माघार घेण्यास भाग पाडले. निवडणुकीत संधी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केलेल्यांनी तर पडद्याआड आर्थिक तडजोड करून घेतल्याच्याही खमंग चर्चाही चर्चिल्या गेल्या.महापालिका निवडणुकीची नुसती चर्चा सुरू झाल्यापासूनच इच्छुकांना घुमारे फुटून आपल्याला सोयीच्या ठरणाऱ्या प्रभागाची शोधाशोध तर केलीच, परंतु प्रत्यक्ष प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर पॅनलमध्ये कोण असावे आणि कोण नसावे याचाही अंदाज बांधला. राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी उंबरठे झिजविण्याबरोबरच पक्षांतराचा पर्यायही खुला ठेवला. अशा प्रकारचा सर्व खटाटोप करून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांसाठी आता प्रतिस्पर्र्धीदेखील नकोसे वाटू लागल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून माघारीसाठी प्रयत्न केले जात होते, त्याची झलक मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून सर्वत्र दिसली. महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्यांबरोबरच अपक्ष व आघाडी करून रिंगणात उभे असलेल्यांमुळे एकेका गटात सहा ते सात उमेदवार रिंगणात शिल्लक असल्यामुळे विजयाचे गणित बिघडण्याची भीती अनेकांना वाटू लागली, त्यामुळे शक्यतो अपक्ष व आघाडी केलेल्यांना माघार घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले.प्रतिस्पर्ध्याला फोडला घामकाहींवर सामाजिक, जातीय दबाव टाकण्यात आला, तर काहींना शेवटची संधी आहे, पुढची संधी तुम्हाला, असे आश्वासन देऊन मनधरणी करण्यात आली. काही चाणाक्ष उमेदवार या साऱ्या प्रकारांपासून परिचित असल्याने भूमिगत झाले असता, त्यांच्या शोधासाठी वणवण करावी लागली. कसेबसे हाती लागलेल्यांना मानसन्मान देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत आणण्यात आले. काही बाहुबलींनी तर थेट ‘पाहून घेऊ’ अशी दमबाजी करून प्रतिस्पर्ध्याला घाम फोडला. माघार घेण्यासाठी दुपारी तीन वाजेची अंतिम मुदत असल्यामुळे दुपारी बारा वाजेपासूनच प्रमुख उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकला होता. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून कोण माघार घेतो याकडे राजकीय पक्षांचे पदाधिकारीही लक्ष ठेवून होते. माघारीच्या दिवशी हाणामारी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.