शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अध्यक्षपदाचा उमेदवार बुधवारी  ठरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 19:24 IST

गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीवर रवाना झाले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीचा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बेबनाव झाल्यामुळे या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या निवडीवर काय परिणाम होतो त्यावर भाजप लक्ष ठेवून आहे.

गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याने शिवसेना, राष्टÑवादीचे सदस्य एकत्रित सहलीसाठी रवाना झाले आहेत. तर कॉँग्रेसचे सदस्य मात्र स्वतंत्रपणे दुसऱ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्टÑवादी, कॉँग्रेस या चारही पक्षांनी सोयीसोयीने एकमेकांशी जुळवून घेत जिल्हा परिषदेत सत्तेची पदे अडीच वर्षे भोगली. आता मात्र महाविकास आघाडी झाल्याने भाजपला दूर ठेवण्यावर उर्वरित तिन्ही पक्षांचा भर असला तरी, अध्यक्षपदाचा उमेदवार व सत्तेतील वाटा अधिक मिळावा, असा प्रयत्न शिवसेनेसह राष्टÑवादीचा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे सदस्य एकत्रित सहलीसाठी रवाना झाले असले तरी, त्यांच्यात मनसुबे वेगवेगळे आहेत. शिवाय दोन्ही पक्षांतर्गत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. प्रत्येकाने आपापल्यापरिने पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांचे मंगळवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले असून, बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलून महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरण्याची त्याचबरोबर सेनेकडूनही अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद