शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाच्या हट्टापायी पक्ष दावणीला

By admin | Updated: March 23, 2017 01:41 IST

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांना जिव्हारी लागला आहे.

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांना जिव्हारी लागला असून, अध्यक्षपदाच्या ईर्षेपोटी एका नेत्याने पक्ष दावणीला बांधल्याचा आरोप आता राष्ट्रवादीच्या सदस्यांमधून करण्यात येत आहे.मंगळवारी झालेल्या भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एकत्रित बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या तब्बल १५ ते १६ सदस्यांनी संबंधित माजी आमदाराच्या हेकेखोरपणाबद्दल आपली उघड उघड नाराजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार व माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. असे असले तरी अधिकृतपणे बोलण्यास कोणीही सदस्य तयार नसून याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याचे समजते. खायचे तर तुपाशी नाही तर उपाशी, या उक्तीनुसार पाहिजे तर अध्यक्षपद अन्यथा काही नाही, या उक्तीनुसार पक्षाची वाटचाल जिल्हा परिषद निवडणुकीत झाली. वास्तविक निवडून आलेल्या १८ सदस्यांची मते जाणून त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते, अशी कुजबूज आता नवनिर्वाचित सदस्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांचा ओढा पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेसोबत जाण्याचा असताना सदस्यांची मते विचारात न घेताच भाजपाबरोेबर जाण्याचा निर्णय घेऊन पक्षाला वीस वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याचा आरोप आता काही सदस्य खासगीत बोलताना करीत आहेत. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव तसेच श्रीराम शेटे यांनी यासंदर्भात वरिष्ठांपर्यंत भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. या बैठकीस भाजपाचे १५ व एक सहयोगी तसेच राष्ट्रवादीचे १८ व एक सहयोगी असे एकूण ३५ सदस्य उपस्थित असल्याचे कळते. (प्रतिनिधी)