शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षणाचा प्रारूप आराखडा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:00 IST

नाशिक : जिल्ह्णातील मध्यम व मोठ्या धरणांच्या पाण्याचे सिंचन, पिण्यासाठी व उद्योगासाठीच्या वाटप नियोजनाच्या पूर्वतयारी बैठकीत गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून त्यांची मागणी नोंदवून घेतली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया पाणी नियोजन समितीच्या बैठकीत या पाणी आरक्षणावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पुनंद, चणकापूरला वाढीव मागणी : पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० दलघफूचे आरक्षण?

नाशिक : जिल्ह्णातील मध्यम व मोठ्या धरणांच्या पाण्याचे सिंचन, पिण्यासाठी व उद्योगासाठीच्या वाटप नियोजनाच्या पूर्वतयारी बैठकीत गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून त्यांची मागणी नोंदवून घेतली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया पाणी नियोजन समितीच्या बैठकीत या पाणी आरक्षणावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांच्या दालनात गुरुवारी गोदावरी, कादवा, गिरणा या प्रमुख खोºयातील कार्यकारी अभियंत्यांसह नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पिण्यासाठी व उद्योगासाठीची या वर्षीची मागणी नोंदवून घेतली. तसेच जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रानुसार त्या त्या धरणातील पाण्याची मागणी याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मागील वर्षी १५ आॅक्टोबरला जिल्ह्णातील धरणांमध्ये ९२ टक्के साठा होता. यावर्षी ९१ टक्के साठा आहे. यामुळे मागील वर्षाप्रमाणेच बिगर सिंचनाचे आरक्षण करण्याबाबत चर्चा झाली. यापेक्षा अधिक बिगर सिंचनाची मागणी असेल, तर त्याबाबत पालकमंत्र्यांसमोर तो विषय मांडण्याचा निर्णय झाला. यावेळी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अंतर्गत धरणांमधील पाणी मागणीबाबतचा अहवाल सादर केला. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता चौधरी आदींसह विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.५०० दलघफू आरक्षणजिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या मनेगाव १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (भोजापूर प्रकल्प), देवळा १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (चणकापूर), दाभाडी १२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (चणकापूर/हरणबारी) लासलगाव-विंचूर १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (पालखेड), येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा (पालखेड) आदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे ५०० द.ल.घ.फू पाणी आरक्षण ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.पूनद-चणकापूरला वाढीव मागणीमागील वर्षी असलेल्या आरक्षणात पूनद व चणकापूर प्रकल्पात यावर्षी जादाचे पाणी आरक्षणाची मागणी आली आहे. या मागणीबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. मग पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत यावर्षीचे पाणी आरक्षण कायम करण्यात येणार असल्याचे समजते.०२ पीएचएनओ-७९-पाणी आरक्षणासंदर्भात बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन. समवेत अन्य अधिकारी. पुनंद, चणकापूरला वाढीव मागणीमागील वर्षी असलेल्या आरक्षणात पुनंद व चणकापूर प्रकल्पात यावर्षी जादाचे पाणी आरक्षणाची मागणी आली आहे. या मागणीबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. मग पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत यावर्षीचे पाणी आरक्षण कायम करण्यात येणार असल्याचे समजते.