शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

युवास्पंदनमध्ये कलाविष्कारांचे सादरीकरण मविप्र : वाद्यवादन आणि नाट्याने रंगला महोत्सवाचा दुसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:27 IST

नाशिक : मविप्र संस्थेतर्फेआयोजित युवास्पंदनच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) शास्त्रीय संगीत, गायन, वाद्यवादन, स्कीट, माइम या विविध कलाविष्कारांनी रावसाहेब थोरात सभागृहात रंगत आणली.

नाशिक : मविप्र संस्थेतर्फेआयोजित युवास्पंदनच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) शास्त्रीय संगीत, गायन, वाद्यवादन, स्कीट, माइम या विविध कलाविष्कारांनी रावसाहेब थोरात सभागृहात रंगत आणली. सकाळच्या सत्रात शास्त्रीय गायन स्पर्धेत मुलतानी, मौनपुरी, भैरव, बागेश्री, भीमपलासी इ. रागांचे सादरीकरण करण्यात आले. वाद्यवादन स्पर्धेत हार्मोनिअम, क्लोरोनेट, व्हायोलिनच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. तालवाद्य स्पर्धेमध्ये तबला, पखवाज या प्रकारात चौताल, रूपक, तीनताल, सोलोवादन करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून शास्त्रीय गायक प्रा. डॉ. अविराज तायडे, प्रसिद्ध हार्मोनिअमवादक पंडित सुभाष दसककर उपस्थित होते.वाद्यवादन प्रकारामध्ये क्लोरोनेट, व्हायोलिन हे प्रकार लुप्त होत असताना युवास्पंदन स्पर्धेतील स्पर्धकांनी या प्रकारच्या सादरीकरणातून सर्वांना प्रेरणा दिली. दुपारच्या सत्रात स्कीट, माईममध्ये ‘पाणी वाचवा-देश वाचवा’, ‘शेतकरी आत्महत्या’, ‘स्त्रीभ्रूण हत्या’ , ‘मुलगी वाचवा’, ‘महिला अत्याचार’ आदी ज्वलंत विषयांवर कलाकारांनी आपल्या अभिनयाने मोहर उमटविली. यावेळी १२ स्कीट व ११ माईमचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक सचिन पिंगळे, नाट्य परिषदेचे रवींद्र कदम, अभिनेते संजय भुजबळ, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. मुंगसे, प्रा. तुषार पाटील, डॉ. जगदीश परदेशी, प्रा. योगेशकुमार होले, प्रा. संजय राठोड, प्रा. प्राची इंगळे, प्रा. कांचन बागुल आदी उपस्थित होते. शनिवारी (दि. ३०) एकांकिका व मिमिक्र ींचे सादरीकरण होणार असून, रविवारी (दि. ३१) शास्त्रीय व लोककला नृत्यांनी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर्व प्रकारांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.