नाशिक : हवेत स्वच्छंदपणे विहरणारे पक्षी, वेगवेगळे प्राणी, हवेत डोलणाऱ्या वनस्पती हे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उडण्यास पात्र होते, परंतु माणसाने सुद्धा आकाशात झेप घ्यावी या ध्येयाने भारतातील शिवकर तळपदे यांनी प्रथमच विमान बनवले; परंतु इंग्रजांच्या जाचामुळे हे शक्य होऊ शकले नाही, असे मत माधव खरे यांनी भोसला महाविद्यालयातील ‘एअर फोर्स डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरु वारी ‘एअर फोर्स डे’ साजरा करण्यात आला. यावेळी खरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एअरक्र ाफ्टची निर्मिती, एअरक्र ाफ्टचा इतिहास, एअरक्र ाफ्टचे विविध प्रकार याबद्दल माहिती दिली. पुढे बोलताना माधव खरे यांनी विद्यार्थ्यांना जे काही सुचेल ते कागदावर लिहिण्याची सवय लावण्याची तसेच छोट्या स्वरूपात एअरक्राफ्टची निर्मिती करण्याच्या दृष्टीने विमान बनविण्यासाठीचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. एव्हीएशनविषयी सांगताना माधव खरे यांनी सर जॉर्ज केअली यांनी सर्वात प्रथम यशस्वी ग्लायडर तयार केल्याने त्यांना ‘फादर आॅफ ब्रिटिश एव्हीएशन’ असे संबोधले गेल्याचे सांगितले. विमान जर तंदुरु स्त असेल तर विमानातून प्रवास करणे, हे सर्वांत सोपे आहे. पूर्वी ब्रिटिशांची नेव्ही खूप बलशाली होती. मात्र विमानाच्या निर्मितीनंतर नेव्हीचे महत्त्व कमी झाल्याने विमानाचे महत्त्व वाढल्याचेदेखील खरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘एरो मॉडेल शो’ साजरा करीत एअरक्र ाफ्टची विविध प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली. थर्माकोलच्या प्लेट, थर्माकोल शीट, पतंग यापासून तयार केलेले एरो मॉडेल्स पाहताना उपस्थित विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. हे मॉडेल्स तयार कसे करावे, याची माहितीही खरे यांनी यावेळी दिली. तसेच ‘ड्रील कॉम्पिटीशन’ही येथे घेण्यात आली. या ड्रील कॉम्पिटिशनमध्ये भोसला मिलिटरी स्कूलने प्रथम, तर जे. डी. सी. बिटको शाळेने द्वितीय क्र मांक मिळविला. यावेळी रिटायर्डग्रुप कॅप्टन सुहास पाठक, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे डी. के. कुलकर्णी, डॉ. जे. आर. मगरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी) फोटो डेस्कस्कॅनला ‘०८ पीएचओटी ६१’ नावाने सेव्ह आहे. कॅप्शन : भोसला मिलिटरी हायस्कूल येथे आयोजित ‘एअर फोर्स डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात ‘एयर मॉडेल शो’ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना माधव खरे.
‘एअर मॉडेल्स’च्या सादरीकरणाने उत्साह द्विगुणीत
By admin | Updated: October 9, 2015 01:03 IST