शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:12 IST

देवगाव : निफाड तालुक्यासह देवगाव परिसरात पावसाने एक तासाहून अधिक हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीला जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली.

देवगाव : निफाड तालुक्यासह देवगाव परिसरात पावसाने एक तासाहून अधिक हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीला जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली.कोरोना व लॉकडाऊनचा सामना करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. काही शेतकºयांनी हात उसनवारीने तर काहींनी पिकांच्या उत्पन्नातून बियाणाचे पैसे देण्याचा वायदा करून तसेच काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवलेल्या पैशातून बियाणाची खरेदी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने महिन्यापासून पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय, या विवंचनेत शेतकºयांची चिंता वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात रोज ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन पावसाने जोरदार हजेरी लावली. ३ वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगाव व परिसरात पिकांना मोठा आधार मिळाला. या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस जोरदार असल्याने पिकांवरील काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव कमी होईल.-----------------खरीप पिकांना जीवदानपावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका, टमाटा या पिकाला मोठा फायदा होणार आहे. पर्जन्यवृष्टी झाली असल्याने खरीप पिकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. काही भागात विहिरींनादेखील पाणी उतरण्यास प्रारंभ झाला असून, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक