शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लग्नास पोलिसांची उपस्थिती गैरलागू नाही

By admin | Updated: June 2, 2017 02:13 IST

नाशिक : मुस्लीम समाजाचे धर्मगुरू शहर-ए-खतिब हिसामोद्दीन यांच्या पुतण्याच्या लग्न सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थितीसंपर्काचा भाग होती

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुस्लीम समाजाचे धर्मगुरू शहर-ए-खतिब हिसामोद्दीन यांच्या पुतण्याच्या लग्न सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही केवळ सार्वजनिक संपर्काचा भाग होती. कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम अथवा त्याच्या नातलगाशी त्यांचा कोणत्याही स्वरूपाचा वैयक्तिक संबंध आढळून आलेला नाही, असा निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी काढला आहे.नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात राहाणारे हिसामोद्दीन खतिब यांचे पुतणे शाकीर रजा यांचा विवाह जकी उस्मान कोकणी यांची मुलगी झोया हिच्याशी १९ मे रोजी झाला. या लग्न सोहळ्यास राजकीय नेते, शहरातील व्यापारी, व्यावसायिक व पोलिस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.मात्र, जकी उस्मानची पत्नी आणि कुख्यात गुन्हेगार दाऊदचा भाऊ इकबाल कासकरची पत्नी दोघी बहिणी आहेत. त्यामुळे दाऊदच्या नातेवाईकाचे लग्न असताना त्यास पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती कशी? असा सवाल उपस्थित करत संशय व्यक्त करण्यात आला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पोलिस उपाआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपला अहवाल सादर केला आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या कामी हिसामोद्दीन खतिब यांचे नेहमीच सहकार्य असते. शिवाय, ते शांतता कमिटीचे सदस्य आहेत. केवळ या सार्वजनिक संपर्कातूनच पोलिस अधिकारी व कर्मचारी या लग्न समारंभास उपस्थित राहिले. खतिब यांच्या पुतण्याचे लग्न नेमके कोणाशी आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. दाऊदच्या नातलगाशी हे लग्न असल्याचे समजले असते, तर कदाचित पोलिसांनी या विवाह समारंभास जाण्याचे टाळले असते, असे उपायुक्त पाटील यांनी आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.लग्न सोहळ्यास हजेरी लावलेल्या पोलिसांची दाऊद अथवा त्याचा नातलग जकी उस्मानशी कोणत्याही स्वरुपाचे वैयक्तिक संबंध आढळून आले नाहीत, असा निष्कर्षही चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. शिवाय, नाशिक शहरात कोकणी मुस्लीमांचे सर्वच क्षेत्रात प्राबल्य आहे. त्यामुळे गैर कोकणी (दखनी मुस्लीम) यांच्यात नेहमीच वाद होत असतात. यातूनच लग्नाच्या अनुषंगाने सोशल मीडियातून पोलिसांची बदनामी करण्यात येत असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. ही चौकशी केवळ पोलिसांशी संबंधित असल्याने लग्नास उपस्थित राहिलेल्या राजकीय व्यक्तिंचा उल्लेख करण्यात आलेला नाही.लग्न सोहळ्यास हजेरी लावलेल्या पोलिसांची दाऊद अथवा त्याचा नातलग जकी उस्मानशी कोणत्याही स्वरुपाचे वैयक्तिक संबंध आढळून आले नाहीत, असा निष्कर्षही चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. शिवाय, नाशिक शहरात कोकणी मुस्लीमांचे सर्वच क्षेत्रात प्राबल्य आहे. त्यामुळे गैर कोकणी (दखनी मुस्लीम) यांच्यात वाद होत असतात. यातूनच लग्नाच्या अनुषंगाने सोशल मीडियातून पोलिसांची बदनामी करण्यात येत असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. ही चौकशी केवळ पोलिसांशी संबंधित असल्याने लग्नास उपस्थित राहिलेल्या राजकीय व्यक्तिंचा उल्लेख करण्यात आलेला नाही.