शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाळोबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: February 7, 2017 23:53 IST

दोडी येथे उद्यापासून यात्रा : शुक्रवारी मुखवट्याचे पूजन, राज्यभरातील भाविक येणार

नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत व सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवार (दि. ९) पासून यात्रेस प्रारंभ होत आहे. श्री म्हाळोबा महाराज यात्रा समितीची नुकतीच बैठक होऊन उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. बोकडबळीमुळे राज्यभर ही यात्रा ओळखली जाते. म्हाळोबा महाराजांना मानणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. गेल्या पाच वर्षांपासून मंदिराचे लोकवर्गणीतून जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. सदर काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या सभामंडपात आकर्षक मार्बल्स बसविण्यात आली असून, लांबी वाढविण्यात आली आहे. यामुळे म्हाळोबा महाराजांचे मंदिर आकर्षकरीत्या सजले आहे.  यात्रेव्यतिरिक्तही वर्षभर म्हाळोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावून नवसपूर्तीसाठी बोकडबळी देत असतात. बुधवारी रात्री भाविक गंगेचे पाणी आणून गुुरुवारी पहाटे म्हाळोबा महाराजांना अभ्यंगस्नान घालणार आहेत. गुरुवारी सकाळी देवाच्या मुखवट्याची व पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  या मिरवणुकीत रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोल व व्हलाराच्या सनईवाद्यात निघणारी मिरवणूक आकर्षक ठरणार आहे. यावेळी भक्तगण धनगर गजनृत्य सादर करून काठीमहाल नाचवित नेणार आहे. महिलांच्या हस्ते देवाची व काठीमहालाची पूजा करतात. त्यानंतर मुखवटा स्थापना करण्यात येणार आहे. गुुरुवारी सायंकाळी स्थानिक भगत असणारे शिंदे मंडळी नवसाचे बोकडबळी देतील.   शुक्रवारी सकाळी माघ पौर्णिमेच्या दिवशी गादीचे व मुखवट्याचे पूजन केले जाणार  आहे. दिवसभर मंदिरात होमहवन, आरती व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. वर्षभर म्हाळोबा महाराजांना जे भाविक नवस कबूल करतात ते बोकडबळीसाठी येथे येतात. यादिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व बोकडबळी दिले जातात. नवसपूर्तीसाठी महिला गळ खेळणे व लोटांगण घेणे आदि कार्यक्रम करतात. तळेगाव येथील भक्तगणांना गादीच्या देवाचा व काठीचा मान दिला जातो.  राज्यभरातून येथे काठ्या येतात. पाऊल टेकडीपासून मंदिरापर्यंत काठीची देवास भेट घडविली जाते. त्यानंतर रात्रभर भगत मंडळी डफाच्या तालावर देवाची गाणी म्हणतात. शनिवारी दुपारी तीन वाजता नामवंत मल्लांची कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची दुकाने दाखल होण्यास सुुरुवात झाली आहे.  यात्रोत्सव पार पाडण्यासाठी समितीचे पाराजी शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब शिंदे, मारुती शिंदे, कारभारी शिंदे, भारत शिंदे,  कचरू शिंदे, रतन शिंदे, जानकू शिंदे, रभाजी जाधव, साहेबराव शिंदे, शिवाजी शिंदे, रायभान शिंदे, काशीनाथ शिंदे, मल्हारी शिंदे,  सुभाष शिंदे, चंद्रभान जाधव, किसन शिंदे, बापू शिंदे, माधव शिंदे आदिंसह यात्रोत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)