शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदली प्रक्रियेलाच आव्हान देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:28 IST

शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या मिळविल्याप्रकरणी ज्या सक्षम प्राधिकरणाकडून आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे अपेक्षित होते तसे न करता स्थानिक पातळीवर शिक्षण विभागातीलच अधिकारी निर्णय घेत असल्यामुळे या सुनावणीवर संशय व्यक्त होत असतांनाच आता ही संपूर्ण बदली प्रक्रियाच रद्द करण्यासाठी राज्यव्यापी शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. शासनाने केलेल्या बदलीला हरकत घेणारी याचिका लवकरच न्यायालयात दाखल केली जाणार असल्याचे समजते.

नाशिक : शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या मिळविल्याप्रकरणी ज्या सक्षम प्राधिकरणाकडून आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे अपेक्षित होते तसे न करता स्थानिक पातळीवर शिक्षण विभागातीलच अधिकारी निर्णय घेत असल्यामुळे या सुनावणीवर संशय व्यक्त होत असतांनाच आता ही संपूर्ण बदली प्रक्रियाच रद्द करण्यासाठी राज्यव्यापी शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. शासनाने केलेल्या बदलीला हरकत घेणारी याचिका लवकरच न्यायालयात दाखल केली जाणार असल्याचे समजते. २७ फेबुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदलीचे अधिकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. त्यामुळे शासनाने आॅनलाइन पद्धतीने केलेल्या बदल्या या नियमबाह्ण असल्याचा मुद्दा न्यायालयापुढे मांडण्याचा विचार शिक्षक संघटनांनी केला आहे. शासनाने बदल्या करताना अनेक नियमबाह्ण प्रकार केले आहेत. विशेष म्हणजे शासनाने शिक्षक बदल्यांचा अधिकृत कार्यक्रम शासनाने जाहीर केलेला नव्हताच असा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. दुसरी बाब म्हणजे बदली कायद्यानुसार केवळ ३० टक्के बदल्या करता येतात परंतु शिक्षक बदलीमध्ये असा कोणताच नियम पाळण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील सर्व शिक्षक बदलून गेले आहेत. अशा ठिकाणी सर्व शिक्षक नवीनच रुजू झाले आहेत.पती-पत्नी एकत्रीधोरण बदलीमध्ये शंभर टक्के पाळण्यात आले नाही. किंवा राबविण्यातच आलेले नाही. पती-पत्नी एकत्रीकरणाचा नियम असतानाही बदली करताना मात्र अनेक पती-पत्नींवर अन्याय झालेला आहे. विशेष म्हणजे इतके वर्ष ते एकत्रीकरणाची अपेक्षा करून होते त्यांना पुन्हा पुढील तीन ते चार वर्ष एकत्र येताच येणार नाही असा घोळ बदल्यांमध्ये झाला आहे. शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांमुळे एका शिक्षकाने चुकीची माहिती भरली असली असेल तर त्याच्यामुळे ३० ते ३५ शिक्षक बाधित झाले आहेत. याशिवाय बोगस शिक्षक बदली तपासण्याची सक्षम यंत्रणाच जिल्हा परिषदांकडे नाही. या बदलीमुळे कनिष्ठ आणि सेवा ज्येष्ठता शिक्षकांमध्येदेखील भेदभाव झाला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या न केल्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांनी दिलेले विकल्प टळून कनिष्ठ शिक्षकांना त्या जागा मिळाल्या आहेत.गिते यांच्या भूमिकेवर नाराजीअमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संशयास्पद बदली आाणि खोटी माहिती भरून सोयीचे ठिकाण निवडणाºया शिक्षकांवर तडकाफडकी कारवाई केल्याचे समजते. त्यांनी अशा शिक्षकांची बदली अवघड क्षेत्रात करून पाच वर्षांसाठी बदलीसाठी अपात्र ठरविले असून, त्यांना कार्यमुक्तदेखील केले आहे; मात्र नाशिक जिल्हा परिषदेकडून शिक्षकांसंदर्भातील कोणतीही कारवाई होत नसल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांना सुनावणी प्रक्रियेविषयी संशय आहे. हा संशय दूर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कोणतीही भूमिका घेत नसून तक्रारदारांंचे समाधान व्हावे यासाठी नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते हे ठाम भूमिका घेताना दिसत नसल्याचा शिक्षकांचा रोष आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद