शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा यंत्रणेची तयारी पूर्ण

By admin | Updated: February 10, 2016 00:02 IST

पंतप्रधान येण्याची शक्यता : बॉम्बशोधक पथकासह अन्य यंत्रणा दाखल

 सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी सुरक्षा यंत्रणेचीही तयारी पूर्ण झाली असून, सहा बॉम्बशोधक पथक, तीन अग्निशमन पथक, दंगा नियंत्रक पथक, आठशे पोलीस कर्मचारी, शंभर पोलीस अधिकारी सर्वच फौजफाटा मंगळवारी दाखल झाला.या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता गृहीत धरूनच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईत मेक इन इंडियाचे लॉचिंग पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी मोदी विशेष विमानाने मांगीतुंगी येथे उपस्थित राहणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने यंत्रणेने पावले उचलली आहेत.मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेवाच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीचा गुरुवारपासून सलग आठ दिवस पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान देश-विदेशातून पंधरा ते वीस लाख भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार आदि व्हीआयपी मंडळींना मूर्ती निर्माण समितीने प्रत्यक्ष भेटीदरम्यान निमंत्रण दिले आहे. त्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणि लष्करच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण भागाची पाहणी केली होती.मात्र जिल्हा प्रशासनाला मोदींच्या उपस्थितीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार की नाही याबाबत अनिश्चिततता होती. परंतु अचानक गेल्या दोन दिवसांपासून सहा जिल्ह्यांचे बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढत तळ ठोकला आहे.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते येत्या १४ फेब्रुवारी रोजी मेक इन इंडियाचे लॉचिंग आहे. या कार्यक्रमादरम्यान ते मांगीतुंगी येथे हजेरी लावण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात असून, त्या दृष्टीने सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. काल बॉम्बशोधक पथकासह तीन अग्निशमन दलाचे पथक, आठशे पोलीस कर्मचारी, शंभर पोलीस अधिकारी, दंगा नियंत्रक पथक असा सर्व फौजफाटा मांगीतुंगीत दाखल झाला आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी तत्काळ तीन हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू आहे. सायंकाळी दंगा नियंत्रक पथकाकडून सातशे जणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सुरक्षा यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नियंत्रण कक्ष ताब्यात घेऊन कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. (वार्ताहर)