शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढाईसाठी कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:17 IST

नाशिक : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळता कोरोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कृती आराखडा तयार केला असून, त्यासाठी कोरोना सदृश रुग्ण आढळल्यास त्याच्यावर गावातच उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळता कोरोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कृती आराखडा तयार केला असून, त्यासाठी कोरोना सदृश रुग्ण आढळल्यास त्याच्यावर गावातच उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेआठ हजार संभाव्य रुग्ण या सेंटरमध्ये दाखल होण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक गावातील शाळा, वसतिगृह व खासगी रुग्णालये त्यासाठी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. प्रायोगिक पातळीवर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे पोहोचली असून, त्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावचे आहेत. जिल्ह्यातल ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी, केंद्र सरकारने आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा टप्पा असल्याचे कळविले आहे. त्यामुळे शहरी भागातील लोण ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची जबाबदारी घटना व्यवस्थापक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्याची उपलब्ध असलेली साधनसामुग्री, मनुष्यबळ, औषधांचा साठा लक्षात घेता बनसोड यांनी तीन टप्प्यात कोरोनाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. प्राथमिक पातळीवर प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५६ गावांची निवडही करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये गावातील कोणत्याही व्यक्तीस कोरोनासदृश आजाराचे लक्षण दिसल्यास त्याच ठिकाणी वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार असून, येथेच त्याचा स्वॅब घेण्यात येऊन तो तपासणीसाठी पुढे पाठविला जाणार आहे. रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्याला एक तर होम क्वारंटाइन किंवा इन्स्टिट्यूट क्वारंटाइन केले जाईल. त्यावर पुढील चौदा दिवस देखरेख ठेवण्यात येईल. मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला याच केअर सेंटरमध्ये स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. या केअर सेंटरसाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, याशिवाय जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेच्या अख्यत्यारितील आरोग्य सेवाही दिमतीला ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात आठ हजार ४७० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक