शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाइन डे’ची तयारी वेगात

By admin | Updated: February 10, 2017 00:23 IST

बाजारपेठा सज्ज : निवडणुकांमुळे यंदा नसणार विरोध

 नाशिक : व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाच्या उत्सवासाठी गुलाबाची फुले, आकर्षक स्वादातले चॉकलेट, कॅडबरीसह गोड पदार्थ, ग्रिटिंग्ज, भेटवस्तू, हॉटेल्स, पर्यटनस्थळे आदि साऱ्यांची सज्जता झाली आहे. पारंपरिकतेने व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनला दरवर्षी होणारा विरोधाचा अडसर यंदा येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे दूर होणार असून प्रेमिजनांना मनसोक्तपणे हा दिवस साजरा करता येणार आहे.प्रेमदिनासाठी शहरातील बाजारपेठा विविध भेटवस्तूंनी फुलल्या असून, गुलाब, गॅलिटर, टाटा गुलाब, फर्स्ट रेड, मिक्स गुलाब यांसह देशी-विदेशी गुलाबपुष्प आदि फुले बाजारात दाखल झाली आहेत. चॉकलेट्सचे नवीन प्रकार, टेडि बिअर, विविध आकर्षक भेटवस्तू दुकानांमध्ये सजल्या आहेत. अगदी दहा रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत मराठी व इंग्रजी शुभेच्छापत्रे, २० ते ५०० रुपयांपर्यंतची विविध प्रकारची चॉकलेट्स दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय मिठाईच्या दुकानांमध्ये चॉकलेट केक, पेस्ट्री यांचेही असंख्य प्रकार तयार करण्यात येत आहेत. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या आवडत्या प्रकारातल्या केक्सची आगाऊ आॅर्डर दिली आहे. लाल, गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जात असल्यामुळे भेटवस्तूंची दुकाने लाल-गुलाबी रंगात न्हाऊन निघाली आहेत. विविध वस्तूही लाल-गुलाबी रंगांच्या आकर्षक वेष्टनात मिळत आहेत. सध्या बाजारात चायना हार्टदेखील आले आहे. म्हणजे हार्ट शेपमध्ये किचेन, गॉग्लस, टोप्या, मग अशा विविध वस्तूंचा यात समावेश आहे. व्हॅलेंटाइनचा फिवर सध्या बाजारपेठेत सगळीकडेच पहायला मिळतो आहे. उशांचे कुशन्स, मग, लेटेस्ट फॅशनचे कपडे, मिठाया, खेळणी आदिंवर प्रेमप्रतीकांचा ठसा पहायला मिळत आहे. आपल्या प्रियजनांना प्रेमाची भेटवस्तू देण्यासाठी त्याची आगाऊ खरेदी करण्यावर बाजारपेठेत भर दिसून येत आहे.