शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मागील पराभवाचे उट्टे काढण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:18 IST

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काही तालुक्यांतील उमेदवारांनी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्यातच यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काही तालुक्यांतील उमेदवारांनी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्यातच यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.रविवारी (दि.१३) मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एकूण दहा हजार १४७ मतदार असून, त्यात सर्वाधिक मतदार हे निफाड, बागलाण व नाशिक तालुक्यांतील आहेत. १४ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी संस्थेच्या घटनेप्रमाणे सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभाही आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे नवीन चेहºयांना संधी देण्याच्या कारणावरून सत्ताधारी प्रगती पॅनलने तब्बल सात विद्यमान संचालकांना उमेदवारी नाकारली आहे, तर या सात विद्यमान संचालकांना गळी लावण्यास विरोधी समाज विकास पॅनलला उमेदवारी देऊन तरी यश आलेले नाही. आता या सात संचालकांची भूमिका निर्णायक ठरू शकते. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे या निवडणुकीत एकाच वेळी अनेक व्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे यंंदाची निवडणूक प्रथमच नात्यागोत्यावर लढली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्या उमेदवारीवर सुरेश डोखळे यांनी आक्षेप घेत त्यांचा अर्ज बाद केल्याने सत्ताधाºयांना तो एक धक्का मानला गेला. यंदा प्रथमच पाच पदाधिकारी पदासह सर्व तालुक्यांच्या संचालकपदाची निवडणुकी चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. चांदवड, नांदगाव, दिंडोरी, मालेगाव, देवळा, बागलाण निफाड तालुक्यांतील लढती रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.