शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: September 8, 2015 23:43 IST

गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

इंदिरानगर : परिसरात गणेशोत्सव मंडळांची तयारी जोमाने सुरू असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडळांनी मंडप उभारणी करून देखाव्यांची तयारीही सुरू केली आहे. गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घराघरात आणि गणेशोत्सव मंडळांनी तयारी जोमाने सुरू केली आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही, याचीही मंडळे काळजी घेणार आहेत.भाजपा प्रणित युनिक ग्रुपच्या वतीने राजीवनगर येथील युनिक मैदानावर भव्य डोम उभारण्यात आला आहे. त्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सालाबादप्रमाणे महिलांच्या कलागुणांना वाव आणि स्वयंरोजगार मिळण्यासाठी सुमारे ३0 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये खाद्यपदार्थ, वस्तूंसह विविध पाळणे, सिशोर, कपसॉयर, रोलर कोस्टर यांसह विविध खेळण्यांमुळे यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. मंडळाचे संस्थापक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सांगितले.शिवसेना प्रणित इंदिरानगर युवक मित्रमंडळाने यंदा गणेशोत्सवातील झगमगाटासाठी होणारा खर्च टाळून वैकुंठरथासाठी करणार आहे. वैकुंठरथ इंदिरानगरवासीयांसाठी नि:शुल्क राहणार असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकर यांनी सांगितले.अजय मित्रमंडळाची ‘श्रीं’ची आगमनाची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरते. शिस्तबद्ध लेजीम पथक आणि युवती, महिलांचा ढोल पथकाचा सराव सुमारे पंधरा दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये सुमारे ५0 युवती, महिलांनी सहभाग घेतला आहे, असे संस्थापक अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.अजिंक्य मित्रमंडळ, राजसारथी मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ, सह्याद्री युवक मित्रमंडळ आदिंसह परिसरातील मित्रमंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.