शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुवाजी बाबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:37 IST

निºहाळे : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या गुरुवारपासून (दि.७) यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणारी पालखी मिरवणूक यात्रेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

ठळक मुद्देनिºहाळे-फत्तेपूर : मिरवणुकीचे आकर्षण

निºहाळे : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या गुरुवारपासून (दि.७) यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणारी पालखी मिरवणूक यात्रेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या प्रारंभाला दोन दिवस श्रीक्षेत्र बुवाजी बाबांचा यात्रोत्सव भरतो. निºहाळे येथे सुरुवातीला बुवाजी बाबांच्या केवळ पादुकावजा मंदिर होते. सन २००४ साली मंदिराचे पुजारी महंत बबन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बुवाजी बाबांचे मंदिर साकारले आहे. तेव्हापासून या यात्रोत्सवाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी येथे यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यावर्षी ७ व ८ मार्च रोजी दोन दिवसीय यात्रोत्सव भरणार आहे. गुरुवारी प.पू. बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता बुवाजी बाबा यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता हभप किसन महाराज काकड यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजता हभप महंत उद्धव महाराज मंडलिक (तुकाराम महाराज संस्थान, नेवासे) यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद व देवाचा कार्यक्रम होणार आहे.दिवसेंदिवस यात्रेला भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यभरातून भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन बुवाजी पुणेकर, महंत बबन सांगळे, सोमनाथ सांगळे, उमाजी पुणेकर, भीमाजी पुणेकर, विष्णू सांगळे, ज्ञानदेव सांगळे यांच्यासह निºहाळे-फत्तेपूर ग्रामस्थांनी केले आहे.