शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या आगमनासाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:15 IST

मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या पूजासाहित्य व श्रींची मूर्ती घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध : पूजासाहित्य, मूर्ती घेण्यासाठी भाविकांची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या पूजासाहित्य व श्रींची मूर्ती घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.गणेश चतुर्थीला घरोघरी विधिवत पूजन करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी बाजारपेठेत ठिकठिकाणी पूजा साहित्य विक्रीची दुकाने सजली आहेत. तसेच गणेशमूर्ती व्रिकीचे स्टॉल थाटले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसा-गणिक वाढत असताना विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. कोरोनापासून सगळ्यांचे रक्षण करावे, असे साकडे बाप्पाला घातले जाणार आहे. पर्यावरणपूरक शाडू-मातीच्या गणेशमूर्तींची दुकाने लागली आहेत. १ शहरात मोसमपूल, सटाणा नाका, रामसेतू परिसरात गणेशमूर्तींची दुकाने थाटण्यात आली आहेत. कोरोनामुळे आरास व मोठे मंडप उभारले जाणार नसले तरी घरगुती व छोट्या-मोठ्या मंडळांनी तयारी सुरू केली आहे. शहरात कंटेन्मेंट झोनवगळता सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देणार आहे. घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट व सार्वजनिक गणेश मंडळासाठी ४ फुटी मूर्ती बंधनकारक करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांचा मंडप १० बाय १० फूट असणे गरजेचे आहे.२ सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध असून, मंडपात मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज बंधनकारक आहे. डीजेला बंदी आहे. शहरात सायं. ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे गणेश-भक्तांमध्ये नाराजी आहे. गणेशभक्तांवर संचारबंदी काळात कारवाई करू नये, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस व मनपा प्रशासनाकडे केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात विसर्जन घरात किंवा पालिकेने उभारलेल्या तात्पुरत्या गणेशकुंडात करावे. कोरोनायोद्ध्यांना श्रद्धांजलीशहरातील नवा होळी चौकातील त्रिशुळ मंडळातर्फे सालाबादप्रमाणे श्रींची स्थापना केली जाणार आहे. कोरोनामुळे केवळ सकाळ, सायंकाळ महाआरती करण्यात येणार आहे. इतर धार्मिक कार्यक्रमांना फाटा दिला जाणार आहे. संचारबंदी उठल्यास आरासच्या दिवशी कोरोना आजारामुळे शहीद झालेल्यांना डिजिटल बॅनरद्वारे अभिवादन केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे जयेश कैचे यांनी दिली.परंपरा होणार खंडितकोरोना प्रतिबंधित क्षेत्रात मंडळ असल्याने यंदा कोणतीही आरास, देखावे केले जाणार नाही. शासनाच्या नियमानुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. ४ फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापन केली जाणार आहे. सर्व कार्यक्रम यंदा स्थगित करण्यात आले आहे. कोरोनामुळे २५ वर्षांपासूनची आरासची परंपरा खंडित होणार असल्याचे सम्राट मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष परदेशी यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवMalegaonमालेगांव