शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीची निवडणूक तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:56 IST

नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही समाजाला न दुखावण्याचा हेतू ठेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने जिल्हा पदाधिकाºयांच्या केलेल्या नियुक्त्या म्हणजे आगामी निवडणुकीची तयारी मानली जात असून, या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून एकमेकांवर ‘चेकमेट’ ठेवण्याची खेळीही खेळण्यात आली आहे.

ठळक मुद्देपक्षाने ओढवून घेतलेली नाराजी

जातीय, भौगोलिक समीकरणे : एकमेकांवर पक्षांतर्गत ‘चेकमेट’पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने 

नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही समाजाला न दुखावण्याचा हेतू ठेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने जिल्हा पदाधिकाºयांच्या केलेल्या नियुक्त्या म्हणजे आगामी निवडणुकीची तयारी मानली जात असून, या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून एकमेकांवर ‘चेकमेट’ ठेवण्याची खेळीही खेळण्यात आली आहे.नाशिकच्या राष्टÑवादी कॉँग्रेसवर भुजबळ यांचे वर्चस्व निर्विवाद असल्यामुळे मुंबईतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नियुक्त्यांच्या घोषणा केल्या असल्या तरी, त्यास भुजबळ यांची संमती असल्याशिवाय ते होणे शक्य नसल्याचे नूतन पदाधिकारीही जाणून आहेत. पुढच्या वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या फेरबदलात सामाजिक, जातीय व भौगोलिक समीकरणाचा मेळ घालण्यात आला आहे.नाशिक लोकसभेची जागा भुजबळ कुटुंबीयातील कोण लढविणार याबाबत कमालीची उत्सुकता व तितकीच गोपनियता पाळण्यात येत असली तरी, या लोकसभेत मोडणारे विधानसभेचे मतदारसंघ व त्यातील जातीय समीकरणे पाहता, कोंडाजी मामा आव्हाड यांना अध्यक्षपदी नेमण्यामागचा राष्टÑवादीचा हेतू लपून राहिलेला नाही. परंतु असे करत असताना विशिष्ट समाजाला झुकते माप दिल्याचा आक्षेप खोडून काढण्यासाठी विष्णुपंत म्हैसधुणे यांना कार्याध्यक्ष करून दोन समाजात समानता साधण्यात आली आहे.असाच काहीसा प्रकार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादीकडून चांगली लढत देऊन दुसºया क्रमांकाची मते घेतली होती. गेल्या साडेचार वर्षांत पवार यांनी या मतदारसंघाशी आपली नाळ कायम ठेवल्यामुळे आगामी निवडणुकीतही त्याच उमेदवार असतील असे आत्तापासूनच गृहीत धरले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करून राष्टÑवादीने दोन्ही गोेष्टी साध्य केल्या आहेत.दिंडोरी मतदारसंघात समाविष्ट तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या अधिक असून, त्या खालोखाल निफाड, येवला, चांदवड या मतदारसंघातील मराठा मतदारांची संख्या लक्षात घेता रवींद्र पगार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. दरम्यान, या नवीन नियुक्त्यांबद्दल काही कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर प्रकट होताना दिसत आहे.पगार यांच्या कार्यकक्षेला मर्यादाभौगोलिक समतोल साधण्यात आला असला तरी, जिल्ह्याची गेल्या दोन टर्म एकतर्फी जबाबदारी पेलणाºया रवींद्र पगार यांच्याकडील जबाबदारी आता कमी करून एकप्रकारे त्यांच्या कार्यकक्षेला मर्यादा घालण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. परंतु या पदांसाठी गेल्या वर्षभरापासून बाश्ािंग बांधून बसलेल्यांची पक्षाने ओढवून घेतलेली नाराजी दूर करण्याची जबाबदारी मात्र आता नूतन पदाधिकाºयांवर येऊन पडली आहे.