शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

नायगाव येथे आठवडे बाजार भरविण्याची तयारी

By admin | Updated: September 16, 2016 22:29 IST

नायगाव येथे आठवडे बाजार भरविण्याची तयारी

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे २४ सप्टेंबरपासून आठवडे बाजार सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. व्यावसायिकांनी या बाजारात सहभागी होण्याचे आवाहन नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे १५ गावांचे केंद्रबिंदू म्हणून नायगाव पूर्वीपासून ओळखले जाते. ७०च्या दशकात या ठिकाणी जनावरांच्या खरेदी - विक्रीसह सर्वच बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याचे सांगण्यात येते. नायगाव पंचक्रोशीच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून, दळणवळण वाढले आहे. परप्रांतीय व्यावसायिकांची संख्या नायगाव खोऱ्यात वाढली आहे. त्याचबरोबरच नागरिकांच्या गरजा ओळखून अनेक नवीन व्यवसाय येथे वाढले आहेत. परिसरातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह, मोहदरी, शिंदे, जाखोरी, दारणासांगवी, जोगलटेंभी, सावळी, पिंपळगाव, तळवाडे, महाजनपूर येथील नागरिकांची बँक, सोसायटी, शाळा, बाजारहाट आदिंसह विविध कामांसाठी नायगाव येथे वर्दळ असते. सिन्नर, नाशिकरोड, सायखेडा या बाजारपेठांऐवजी नायगाव येथूनच भाजीपाला, किराणा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, शेतोपयोगी वस्तू खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नायगाव येथे पूर्वीप्रमाणेच आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच इंदुमती कातकाडे, उपसरपंच अनिता जेजूरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. (वार्ताहर)