शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान

By admin | Updated: May 13, 2014 00:11 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही.

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही. आगामी तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी जुलै ते डिसेंबर या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहेे. जुलै महिन्यात काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने साधारणत: जूनमध्येच मतदान घेण्याचा आयोगाचा इरादा असून, त्यासाठी येत्या २० मेपासूनच ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे तेथे प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या मतदार याद्याच त्यासाठी ग्रा‘ धरण्यात येणार आहेत; परंतु प्रभागनिहाय जाहीर होणार्‍या याद्यांबाबत कोणाच्या काही हरकती वा सूचना असतील त्या त्यांनी तहसिलदारांकडे नोंदवायच्या आहेत. या हरकतींमध्ये नवीन मतदाराचे नाव यादीत समाविष्ट केले जाणार नाही, फक्त नावातील बदल, प्रभागात बदल अशा जुजबी दुरुस्ती मतदार याद्यांमध्ये केल्या जातील त्यासाठी मात्र मतदाराला लिखीत स्वरूपात हरकती नोंदवाव्या लागणार आहेत. २६ मेपर्यंत या हरकती स्वीकारण्यात येणार असून, ३० मेपर्यंत हरकतींची सुनावणी करून, त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नाशिक जिल्‘ातील ७६ ग्रामपंचायतींची या काळात मुदत संपुष्टात येत असून, त्यात इगतपुरी- ३८, निफाड- २१, नाशिक- ३, त्र्यंबक- ३, कळवण- १० व मालेगाव तालुक्यातील एक ग्रामपंचायत आहे. राज्य आयोगाच्या सूचना प्राप्त होताच, जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.