शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती लेकीची हत्या; बापाला फाशीची शिक्षा :आंतरजातीय विवाहाचा राग

By admin | Updated: June 19, 2017 22:13 IST

आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास सोमवारी (दि.१९) जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास सोमवारी (दि.१९) जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपी एकनाथ किसन कुंभारकर (४४) यास फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिक्षामध्ये पोटच्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना २८ जून २०१३ रोजी शहरात घडली होती. या घटनेने नाशिक नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले होते. कामगारनगरमधील काशीनाथ कांबळे यांच्या कु टुंबातील दीपक कांबळे (२३) या तरुणाशी एकनाथ कुंभारकर यांची मुलगी प्रमिलाचे प्रेमसंबंध जुळले होते. वणीच्या गडावर जाऊन २०१२ साली त्यांनी विवाह केला होता. आंतरजातीय विवाह केल्यामुळे प्रमिलाविषयी राग मात्र पित्याच्या मनात कायम होता. सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर कुंभारकर याने मुलीच्या घरी येणे-जाणे सुरू केले. जावयासह सासरच्या लोकांचा विश्वास संपादन केला. प्रमिला नऊ महिन्यांची गर्भवती असताना प्रसूतीच्या काही दिवसांपूर्वीच त्याने पहाटे तिच्या सासरी जाऊन ‘आजीची प्रकृती बिघडली आहे, असे खोटे सांगून प्रमिलाला सोबत घेऊन एकनाथ कुंभारकर निघाला व रिक्षामधून (एमएच १५, जे २५९५) निर्जन ठिकाणी फिरविले. सावरकरनगरमध्ये एका खासगी रुग्णालयासमोर रिक्षा थांबविली आणि रिक्षाचालकाला रुग्णालयातून मामाला बोलवावयास सांगितले. रिक्षाचालक रुग्णालयाच्या दिशेने गेल्यानंतर कुंभारकर याने स्वत:कडे असलेल्या परकराची नाडी काढून शेजारी बसलेल्या प्रमिलाचा गळा आवळला. रिक्षाचालक जवळ आला असता त्याने सदर प्रकार बघितला. यावेळी प्रमिलाच्या तोंडातून फेस येत होता. कुंभारकर याने त्वरित रिक्षातून पलायन केले. रिक्षाचालकाने अत्यवस्थ अवस्थेत प्रमिलाला खासगी रुग्णालयात नेले; मात्र रुग्णालयाने ‘पोलीस केस’ सांगून शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याने प्रमिलाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. ‘आॅनर किलिंग’ प्रकरण असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जन्मदात्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तेव्हापासून आजतागायत लेकीच्या आईने लावून धरली होती. न्यायालयाने या खटल्यात एकूण दहा साक्षीदार तपासले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील डॉक्टर, प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक, मुलीची आई, सासू यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुमारे चार वर्षांनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी कुंभारकर यास फाशीची शिक्षा सुनावली.