शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणवेढे शिवारात कोबी लागवडीस प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:29 IST

एकलहरे : परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर काही दिवस पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे ऊभे राहत असतानाच पावसाने चांगली हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकºयांत समाधान व्यक्त होत आहे.

एकलहरे : परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर काही दिवस पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे ऊभे राहत असतानाच पावसाने चांगली हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकºयांत समाधान व्यक्त होत आहे. एकलहरे, हिंगणवेढे परिसरात यंदा कोबी लागवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक शेतकºयांनी जूनच्या मध्यात कोबीची लागवड केली आहे. सध्या बºयापैकी पाऊस पडत असल्याने कोबीलाही नवसंजीवनी मिळाली आहे. उघडझाप करत पडणाºया पावसात शेतकरी कोबी पिकाला खताची मात्रा देण्यात व्यस्त आहेत. हिंगणवेढे परिसरातील अनेक शेतकºयांचा कल कोबी लागवडीकडे आहे.या भागात फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राऊट या प्रकारच्या कोबीची लागवड केली जाते. जुलै ते आॅक्टोबर या काळात लागवड केल्यास बºयापैकी बाजारभाव मिळतो. त्यामुळे अगदी माळरानावरही कोबीची लागवड केलेली दिसून येते. त्यासाठी रब्बी हंगामात सप्टेंबर आॅक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करतात. तीन ते चार आठवड्यात रोपे लागडीयोग्य होतात. खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात कोबी लागवड केली जाते. आॅक्टोबर ते जानेवारी या कालावधीत लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते. शेतमालाचा दर्जाही उत्तम राहातो. जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत लागवड केल्यास बºयापैकी बाजारभाव मिळतो असे शेतकरी सांगतात.-----------------------कोबीची लागवड हिंगणवेढे परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. पानकोबी ही मोहोरी कुळातील असून, हे पीक कोबीचे प्रकार आणि मातीनुसार ५० ते ९० दिवसात तयार होते. टिकायला व वाहतुकीला सोईचे आहे. कोबीची भाजी पचनास हलकी असून, तिचा उपयोग सारक म्हणून केला जातो. पानकोबी, फुलकोबी हे प्रकार लागवडीसाठी अनुकूल असून, शेतकºयांना फायदेशीर ठरते.- रमेश धात्रक, शेतकरी, हिंगणवेढ---------------------कोबी पिकासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब केल्यास पानकोबीचे सरासरी हेक्टरी ३० ते ५० टन उत्पादन मिळते. संकरित वाणाचे हेक्टरी ७५ ते ८० टनाहून अधिक उत्पादन मिळते. कोबीपासून मिळणारा पाला दुभती जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी वैरण म्हणून वापरता येतो.- वाल्मीक धात्रक, शेतकरी, हिंगणवेढे

टॅग्स :Nashikनाशिक