शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना सुविधा पुरविण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:47 IST

नुकत्याच झालेल्या नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते. केलेल्या कामांच्या मुद्द्यावर आणि एकमेकांची उणीदुणी काढत ही निवडणूक यंदा चांगलीच गाजली. मोठ्या उद्योग घटकासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर टीडीके इपकॉस कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी विजयी झाले.

नुकत्याच झालेल्या नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते. केलेल्या कामांच्या मुद्द्यावर आणि एकमेकांची उणीदुणी काढत ही निवडणूक यंदा चांगलीच गाजली. मोठ्या उद्योग घटकासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर टीडीके इपकॉस कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी विजयी झाले. त्यांच्याशी साधलेला संवाद....प्रश्न- निमा निवडणुकीत मोठ्या कारखान्यांचे प्रतिनिधी थेट निवडणुकीत सहजासहजी भाग घेत नाहीत. पण तुम्ही घेतला?- दोन वर्षांपूर्वी निमा कार्यकारिणीने ठराव करून मला अध्यक्षपद दिले. अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कारकिर्दीत आणि दुसऱ्या वर्षीदेखील पूर्ण निमा टीमने खूप चांगले काम केले. त्यामुळे त्याच टीमच्या आग्रहाखातर मी ही निवडणूक लढविली. मतदारांना केलेले काम चांगले वाटले असेल म्हणून त्यांनी पुन्हा विश्वास टाकला आहे. चांगल्या कामासाठी निवडणूक लढविणे काही गैर नाही.प्रश्न- पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने नवीन योजना काय आहेत?- दोन वर्षांत जी उद्दिष्टे होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी पूर्णपणे समाधानी नाही. सुरू केलेल्या कामांना गती देणे, उद्योजकांना मूलभूत सेवासुविधांसाठी पाठपुरावा करणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाठपुरावा करणे, नवीन तंत्रज्ञान, स्किल डेव्हलपमेंट यात खूप काम करण्यासारखे आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध क्लष्टरची निर्मिती करणे, उद्योजकांना बँका कर्जपुरवठा करण्यास अडचणी निर्माण करतात त्याकडे लक्ष देणे.प्रश्न- तुम्ही एका गटाचे आणि अन्य पदाधिकारी दुसºया गटाचे आहेत. अशा वेळी कामात अडचणी येणार नाहीत?- निवडणुकीपुरते गट-तट आणि मतभेद असावेत. दुसºया गटाचा अजेंडा निमाच्या हितासाठीच असणार आहे. अजेंडा वेगळा असला तरी शेवटी चर्चा करूनच निर्णय घेतले जातात. सभासदांचे व संस्थेचे हितासाठी मतभेद बाजूला ठेवणे गरजेचे असते.प्रश्न- राजकीय पक्षांचे लोक निमात येणे कितपत योग्य?- आपण मतदानाला जातो म्हणजेच प्रत्येक माणूस राजकारणी असतो. निमात पक्षीय राजकारण येणार नाही किंवा निमाचा वापर राजकीय पक्षांसाठी होणार नाही याची काळजी निमा सदस्यांनी घेतली पाहिजे. निमाचा गैरवापर होणार नाही याची अध्यक्ष म्हणून काळजी घेणार आहे.प्रश्न- कामगार आणि व्यवस्थापन कलहात निमाची भूमिका काय?- कोणत्याही कारखान्यात सुरुवातीला चांगले संबंध असतात. त्यात सुसंवाद संपला की ‘इगो’ जागा होतो. त्यामुळे संबंध ताणले जातात. अशावेळी त्रयस्थ म्हणून जरी निमाने पुढाकार घेतला तरी तो दोघांना मान्य होत नाही. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात चांगले संबंध असावेत, अशी निमाची भूमिका आहे. काही वाद निमाने निमा कार्यालयात सोडविले आहेतच. 

टॅग्स :MIDCएमआयडीसी